"डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मी मोठं ऑपरेशन केलंय", एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Eknath Shinde - EKNATH SHINDE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 7, 2024, 9:28 PM IST
नागपूर Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (7 मार्च) नागपूर (Nagpur) येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधला. तसंच यावेळी बोलत असताना त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली. ते म्हणाले की, "राजू पारवे यांच्यासाठी डॉक्टरांनी सहकार्य केलं. मी कोरोना झालेल्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना धीर दिला. कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुतासारखं काम केलं. तसंच मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले", असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.