"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजानं चिंतन करण्याची वेळ" - DR BABASAHEB AMBEDKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 6, 2024, 3:47 PM IST
बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या विविध उपाययोजना या समाजापर्यंत पोहोचतच नाहीत. जो समाज अनुसूचित जाती जमातीमध्ये आहे, हा समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कमी पडत आहे," अशी खंत डीपीआय प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केली. "लोकशाही ही एका धनदांडग्यांच्या हातात गेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे समता, स्वतंत्रता, न्याय, बंधुता या तत्त्वावर आधारित आहे. आजची न्याय व्यवस्था काय करत आहे? आजची पत्रकारिता काय करत आहे? आज सुशिक्षित बेकार होत चालले आहेत. दिल्लीमध्ये तर संविधान जाळण्यापर्यंत मजल या लोकांची होत आहे. संविधानाबद्दल इतका द्वेष का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे अत्यंत कष्टातून निर्माण केले आहे. प्रचंड त्यागातून निर्माण केले आहे. त्यांनी केलेले कष्ट, त्याग याचा विचार करणं आज गरजेचं आहे," असं मत डीपीआय प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केलं आहे.