महाराष्ट्र प्रिमियर लीगमुळं अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी : रणजी प्लेअर अझीम काझी - IPL 2024 - IPL 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 28, 2024, 10:21 PM IST
पुणे IPL 2024 : इंडीयन प्रीमियर लीगच्या धर्तीवर सुरू झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला येत्या 2 तारखेपासून सुरूवात होणार आहे. गतवर्षी विजयी झालेल्या रत्नागिरी जेट्स संघाच्या नव्या जर्सीचे आज अनावरण करण्यात आलं. यावेळी रणजी प्लेअर तसेच कर्णधार अझीम काझी (Azim Kazi) यांनी महाराष्ट्र प्रीमियर लीग बाबत माहिती देत एमपीएलमुळं अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळालं असून पहिल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमधून एक ते दोन खेळाळूची निवड आयपीएलसाठी झाली असून आत्ता देखील या दुसऱ्या महाराष्ट्र प्रिमियर लीगमुळं अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळणार असल्याचं यावेळी काझी यानी सांगितलं आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या मोहिमेस रत्नागिरी जेट्स संघ 2 जून रोजी कोल्हापूर टस्कर्स बरोबरच्या लढतीनं सुरुवात करणार आहे. या दोन संघातच पहिल्या पर्वाची अंतिम लढत झाली होती. संघाच्या नव्या जर्सीत विशाल आणि शक्तिशाली समुद्राचे प्रतिक दाखविणाऱ्या निळ्या रंगाचा समावेश आहे. आम्ही लीगची वाट पाहत आहोत, तयारी उत्कृष्ट झाली आहे. सामना सुरू झाल्यावर प्रत्येककजण त्यांच्या भूमिकेची जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या आवृत्तीत चाहत्यांकडून जसे पाठबळ मिळाले, तसेच याही पर्वात मिळेल असं यावेळी काझी म्हणाला. यावेळी रणजी प्लेअर अझीम काझी यांच्याशी बातचीत केली आहे.