प्रार्थना फाउंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचा समारोप... - Prarthana Foundation - PRARTHANA FOUNDATION

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:44 PM IST

सोलापूर Prarthana Foundation News : शहरात प्रार्थना फाऊंडेशन आयोजित "कृतिशील तरुणाई शिबिराचा" (Creative Youth Camp) समारोप करण्यात आला. "तरुणांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. अडचणी येत राहतील जात राहतील त्याला हिमतीनं सामोरे जा" आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा असं मत, प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी व्यक्त केलंय. प्रार्थना फाऊंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दुसरे कृतिशील तरुणाई शिबिर मोरवंची येथे आयोजित करण्यात आलं होतं. शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी सुहासिनी शहा बोलत होत्या.

आजच्या युवकांमधे सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी आणि समाजाभिमुख तरुण निर्माण व्हावा हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं मत सोमनाथ लामगुंडे यांनी व्यक्त केलं. अन्नदाता असून सुद्धा शेतकऱ्याची कशाप्रकारे अवहेलना होत आहे. त्यामुळं आजच्या युवकांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणं गरजेचं आहे. शेतकरी हा व्यवस्थेचा कणा आहे. त्याला आपण साथ दिली पाहिजे असं व्याख्याते शिवरत्न शेटे सरांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं. या शिबिरात महाराष्ट्रातील युवक-युवती सहभागी झाले होते. यामधे विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या मंडळींनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शक केलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.