महापालिकेच्या मुख्यालयासमोर 55 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच घेतला वारीचा आनंद; काय आहे कारण? - Workers Agitation - WORKERS AGITATION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 17, 2024, 7:57 PM IST
ठाणे Workers Agitation : ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मंगळवारपासून सुरू असलेल्या 55 कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं वारी चुकल्यानं रस्त्यावरच विठ्ठलाची मूर्ती ठेवत वारीचा आनंद घेतला आणि विठू नामाचा गजर केला. मागील दोन महिन्यांपासून पगार मिळत नसलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरुन काढण्यात आलं. त्यामुळं कालपासून महानगरपालिकेचे हे 55 कंत्राटी कर्मचारी महापालिकेच्या समोरच आंदोलनाला बसले आहेत. रात्रभर गेटवरच झोपून त्यांनी रात्री काढली, त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा त्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली. आज विठ्ठलाचा गजर करत आपल्या नोकरीबाबत आणि आपल्या पगाराबाबत त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं आहे. ठाणे डम्पिंग ग्राउंड इथं काम करणाऱ्या 55 कर्मचाऱ्यांचा ठेकेदारांनी मे महिन्यापासून पगार अडवला आणि त्यानंतर अचानकपणे कामावर येऊ नका असे आदेश दिले. हा आदेश आल्यानंतर त्यांचा संसार पूर्णतः उघड्यावर पडला असून या सफाई कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून ठिय्या आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मात्र या सगळ्यात वारकरी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची वारी चुकल्यानं आज महापालिकेच्या समोरच त्यांनी विठूरायाची पूजा केली.