एकीकडं भाजपा आक्रमक तर दुसरीकडं नाना पटोलेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, वाद चिघळण्याची शक्यता - BJP Vs Congress - BJP VS CONGRESS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 12:00 PM IST

पिंपरी चिंचवड Nana Patole News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं बघायला मिळतंय. एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याचा पटोलेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपानं पटोलेंवर चिखलफेक करीत त्यांना चांगलंच धुतलं. या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलाय. नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन अजित पवार आणि अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली होती. यालाच विरोध म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस वाहतूक आघाडीकडून नाना पटोलेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून टीकाकारांचा समाचार घेण्यात आला. तसंच घरी आलेल्या पाहुण्यांचे पाय धुण्याची विदर्भात परंपरा आहे, त्यात काही गैर नाही असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या कृतीचं समर्थन देखील केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.