केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेषा - अमोल कोल्हे - MP Amol Kolhe - MP AMOL KOLHE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 24, 2024, 9:58 PM IST
|Updated : Apr 24, 2024, 10:28 PM IST
पुणे MP Amol Kolhe : देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे. देशातील वारं बदललं आहे. भाजपा सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपाच्या सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचा दावा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून अमोल कोल्हे यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.