आमच्यामुळं कॉंग्रेसचे खासदार निवडून आले हे विसरू नका- भास्कर जाधव - Bhaskar Jadhav On Congress - BHASKAR JADHAV ON CONGRESS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 1, 2024, 6:54 PM IST
|Updated : Aug 1, 2024, 7:05 PM IST
शिर्डी Bhaskar Jadhav In Shirdi : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आज (1 ऑगस्ट) आपल्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईत 16 जागांसाठी कॉंग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवरही कॉंग्रेस दावा करणार असल्याचं सांगितलं जातय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता भास्कर जाधव म्हणाले, "महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघं एकत्र आलो, विशेष करुन उद्धव ठाकरेंनी विशेष भूमिका बजावल्यानं काँग्रेस पक्षाचे इतके खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आलेत. आनंदाच्या भरात काही कॉंग्रेस नेत्यांकडून चूक झाली असेल. निवडणुकीच्या अगोदर आपला एकही खासदार नव्हता हे आनंदाच्या भरात ते विसरले असतील. मात्र, प्रत्यक्षात जागा वाटपाच्या चर्चेवेळी याचं भान त्यांना येईल". उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरही भास्कर जाधव यांनी मार्मिक टिप्पणी केली, ऐका त्यांनी आणखी काय काय सांगितलं...