अत्यंत मोघम आणि निराशाजनक अर्थसंकल्प - ॲड. यशोमती ठाकूर - budget 2024
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-02-2024/640-480-20640799-thumbnail-16x9-thakur.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 1, 2024, 5:16 PM IST
मुंबई : केंद्र सरकारनं सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा कोणत्याही घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प नाही. कोणतीही नवी योजना अथवा एखाद्या क्षेत्रासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही. महिलांवर, शिक्षकांवर ,विद्यार्थ्यांवर, कष्टकऱ्यांवर आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांवर सर्व तऱ्हेनं अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामधून केवळ वरवरच्या घोषणा आणि निवडणुकीच्या दृष्टीनं एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी काही पोकळ घोषणा केल्याचं दिसतं आहे. मात्र या अर्थसंकल्पात बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतीही विशेष तरतूद दिसत नाही. महागाईचा निर्देशांक गगनाला भिडत असताना त्यावर कोणतीही उपाययोजना दिसत नाही. पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये कपात करण्याबाबतच्या उपाययोजना दिसत नाहीत. एकीकडे शेतकरी टाचा घासून मरत असताना या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या खतांच्या सबसिडीबाबत असेल अथवा शेतमालाला दिल्या जाणाऱ्या भावाबद्दल असेल काहीही तरतूद केलेली नाही. महागाईनं जनतेचं कंबरडं मोडत असताना केवळ त्याला तुला रामदर्शन घडवतो, असं सांगून भ्रमिष्ट केलं जात आहे. एकूणच हा अर्थसंकल्प सर्व समाज घटकांवर अन्याय करणारा त्यांच्या पदरात निराशा टाकणारा अर्थसंकल्प आहे. देशाच्या भविष्याचं कोणतंही नियोजन या अर्थसंकल्पात जराही दिसत नाही, अशी जोरदार टीका ॲड. ठाकूर यांनी केली आहे.