विशाळगडावरील दंगा संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी केला : अॅड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Vishalgad Violence Case - VISHALGAD VIOLENCE CASE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 20, 2024, 11:20 AM IST
नांदेड Vishalgad Violence Case: विशाळगडावरील दंगा संभाजी भिडे यांच्या धारकांऱ्यांनी केला, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढं म्हणाले की, "आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन विशाळगडावर गोंधळ घडवून आणण्यात आला आहे. या मागं संभाजी भिडे यांचे धारकरी आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन मौलवींनी केलं होतं. आता या सर्व मौलवींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करावं," असं देखील वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.