जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टला 14 वर्षे पूर्ण; विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली - German Bakery Bomb Blast
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 14, 2024, 2:51 PM IST
पुणे German Bakery Bomb Blast : कोरेगाव पार्क भागामध्ये जर्मन बेकरी येथे 13 फेब्रुवारी 2010 संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास अतिरेक्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला होता. 13 फेब्रुवारी 2010 चा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस होता. या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीत साधासुधा स्फोट नाही तर दहशतवाद्यांनी घडवलेला बाॅम्बस्फोट झाला होता. या घटनेला चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल 18 निष्पाप लोकांचा बळी गेला. तर 60 जण जखमी झाले होते. या सर्वांना काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील श्रद्धांजली वाहत आपली मते व्यक्त केली.