हैदराबाद X fired several employees : एलोन मस्क 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या यूएस प्रेसिडेंशियल इलेक्शन 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, मस्क यांच्या कंपनीनं अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. वर्कप्लेस प्लॅटफॉर्म ब्लाइंडवरील एक्स इनसाइडर्स आणि पोस्टचा हवाला देऊन द व्हर्जने दिलेल्या अहवालानुसार, कंपनीच्या अभियांत्रिकी विभागातून कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.
X कंपनीत टाळेबंदी : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या अमेरिकेत जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, अनेक कंपन्यांकडून टाळेबंदीच्या बातम्या येत आहेत. इलॉन मस्क, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक मस्क यांनी देखील एक्समधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती मिळत आहे.
काय म्हणतो अहवाल? : अहवालानुसार, "या टाळेबंदीच्या प्रक्रियेमुळं प्रभावित कर्मचाऱ्यांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती नाही. दोन महिन्यांपूर्वी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल एक पृष्ठाचा सारांश सादर करण्यास सांगितलं होतं. " एलोन मस्कसह त्यांची कंपनी एक्सनं अद्याप या टाळेबंदीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, कंपनी विकत घेताच मस्क यांनी 80 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं होतं. मस्क यांनी 2022 मध्ये X विकत घेतला होतं. त्यादरम्यान कंपनीच्या सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. कंपनीतील किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय याची माहिती आद्याप मिळालेली नाहीय. विविधता, समावेश, उत्पादन विकास आणि डिझाइन यासारख्या कंपनीच्या अनेक विभागांवर कपातीचा परिणाम झालाय. कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन टीममधील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आलंय. या वर्षी जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. या वर्षी जानेवारीमध्ये, X नं कथितरित्या आपल्या 1 हजार 'सुरक्षा' कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. यापैकी 80 टक्के सॉफ्टवेअर अभियंते होते.
हे वचालंत का :