हैदराबाद Suchir Balaji : ओपनएआयच्या काम करण्याच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अभियंता सुचीर बालाजी त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार मानला आहे. सुचीर सुमारे चार वर्षांपासून ओपनएआयशी संबंधित होते. या वर्षाच्या सुरुवातीला ते कंपनीपासून वेगळे झाले आणि त्यांनी ओपनएआयवर कॉपीराइट उल्लंघनाबाबत अनेक आरोपही केले होते.
सुचीर बालाजी यांची आत्महत्या? : ओपनएआयसाठी काम करणारे आणि नंतर या कंपनीविरुद्ध आवाज उठवणारे व्हिसलब्लोअर भारतीय-अमेरिकन एआय संशोधक सुचीर बालाजी यांचं निधन झालंय. ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत. सुचीर बालाजी यांनी ओपनएआयसाठी चार वर्षे उत्तम काम केलं होतं. त्यांनी चॅटजीपीटीच्या विकासात मोठी भूमिका बजावली होती. बालाजी यांनी ओपन एआयविरुद्ध अनेक आरोप केले होते. त्यांनी आरोप केला होता की, पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींच्या कॉपीराइट केलेल्या साहित्याचा वापर चॅटजीपीटी तयार करण्यासाठी परवानगीशिवाय करण्यात आला आहे. ज्याचा थेट परिणाम अनेक व्यवसायांवर होईल.
आत्महत्या केल्याचा आरोप : वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी बालाजी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. बालाजी यांनी केवळ एआयमध्ये योगदान दिलं, नाही तर या कंपनीतील चुकीच्या पद्धती आणि कृतींविरुद्ध जोरदार आवाजही उठवला. ओपनएआय विरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असं मानलं जात होतं.
सुचिर का आले चर्चेत : एकेकाळी एआयसाठी काम करणारे बालाजी यांनी असा दावा केला होता की ओपनएआयच्या कामाच्या पद्धती धोकादायक आहेत. कारण एआयसाठी परवानगीशिवाय कॉपीराइट केलेले साहित्य वापरलं आहे. बालाजी यांनी एआयच्या नैतिक परिणामाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली होती. न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बालाजी म्हणाले, की ओपनएआयचे व्यवसाय मॉडेल अस्थिर आहे. हे मॉडेल इंटरनेट परिसंस्थेसाठी अत्यंत हानिकारक आहे. ज्यामुळं कंपनी मी कंपनी सोडली होती.
ते लहानपणापासूनच एआयमध्ये सक्रिय : सुचिर बालाजी यांचं बालपण कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो इंथ गेलं. नंतर यूसी बर्कले येथे संगणक शास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्यांना एआयमध्ये रस निर्माण झाला झाला. त्यामुळं त्यांनी रोग बरे करणे आणि वृद्धत्व रोखणे यासारखे एआयशी संबंधित संशोधन करण्यास सुरुवात केली.
ओपनएआयमध्ये काय करत होते सुचिर : ओपनएआयमध्ये असताना, बालाजी यांनी चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणारा इंटरनेट डेटा गोळा करण्यात आणि व्यवस्थित करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्या कामामुळं लोकप्रिय एआय मॉडेलला आकार देण्यात खूप मदत झाली.
हे वाचलंत का :