हैदराबाद : व्हॉट्सॲपनं एक नविन फिचर आणलं आहे. या फिचरमुळं वापरकर्त्यांना ग्रुप नोटिफिकेशन व्यवस्थापित करता येणार आहे. ग्रुपमध्ये येणारे संदेश बहुतेक वेळा युजर्सना त्रासदायक ठरतात. कारण आपण कामात किंवा मिटींगमध्ये असताना आपला फोन मध्येच वाजतो. त्यामुळं आपल्यासह सर्व विचलित होतात. तसंच ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक मेसेजची सूचना आपण लगेच तपसण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हे टाळण्यासाठी आतापर्यंत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲपमध्ये ग्रुप नोटिफिकेशन्स तुम्ही बंद करू शकता. आता नवीन फीचर युजर्सना ग्रुप चॅट्ससाठी नोटिफिकेशन्स मॅनेज करण्यासाठी अनेक पर्याय देत आहे.
ग्रुप चॅटसाठी WhatsApp सूचना : Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.24.10 साठी नवीनतम WhatsApp बीटा अपडेट WhatsApp ग्रुप चॅटसाठी सूचना म्यूट करणं कसे कार्य करते हे दर्शविते. किंवा गट चॅटसाठी कोणत्या सूचना ते निःशब्द करू शकतात. व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटनं आपल्या ताज्या अहवालात या फीचरचा खुलासा केला आहे. रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट देण्यात आला आहे, ज्यामध्ये हे नवीन फीचर स्पष्टपणं दिसत आहे.
नवीन पर्याय कुठे मिळतील? : स्क्रीनशॉटनुसार, आता युजर्स ग्रुप चॅटसाठी अलर्ट मॅनेज करताना नवीन नोटिफिकेशन ॲक्टिव्हिटी फीचर पाहू शकतात. हे नवीन फीचर युजर्सना सर्व ग्रुप मेसेजसाठी नोटिफिकेशन म्यूट करण्याचा पर्याय देतं. किंवा त्यांना नवीन हायलाइट्स पर्याय देखील मिळतं. युजर इतर संबंधित गोष्टींसाठी सूचना म्यूट करू शकता.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट : या वैशिष्ट्यासह, व्हॉट्सॲपचे उद्दिष्ट आहे की वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सूचनांना प्राधान्य देणं सोपं होईल. हे विशेषतः मोठ्या ग्रुपचॅटसाठी आणण्यात येणार आहे. जिथं संदेश मोठ्या संख्येनं येतात. प्रत्येक संदेशासाठी सूचना मिळण्याऐवजी, वापरकर्त्यांना केवळ त्यांच्याशी संबंधित असलेल्या परस्परसंवादासाठी सूचना मिळू शकतात. हे फीचर अनेक वर्षांपासून डिफॉल्ट आहे, परंतु व्हॉट्सॲप आता युजर्सना ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट कसं करावं त्यावर काम करतंय. लक्षात ठेवा की हे वैशिष्ट्य सध्या फक्त Android बीटा वापरकर्त्यांसाठी आणलं जात आहे. येत्या काळात, हे वैशिष्ट्य सर्व वापरकर्त्यांसाठी आणलं जाईल.
हे वाचलंत का :