हैदराबाद Tata Nexon EV and Curvv EV : सध्या भारतात कार प्रेमींमध्ये इलेक्ट्रिक वाहनं लोकप्रिय होत आहेत. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीदारांसाठी करात सूट देत आहेत. तसंच ग्राहकांना सबसिडी यांसारख्या विविध सवलती मिळताय. यामुळं, टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक वाहनं Nexon EV आणि Curvv EV, दोन्ही चारचाकीचे फिचर अप्रतिम आहेत. मात्र, दोन मॉडेलमध्ये मुख्य फरक आहे. दोन्हीमध्ये नेका काय फरक आहे, याची माहिती जाणून घेऊया.
बॅटरी : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचा वीज खर्च पेट्रोल किंवा डिझेल कारच्या इंधन खर्चापेक्षा कमी असतो. यामुळं Nexon EV चारचाकीत 30 kWh ची बॅटरी पॉवर आहे. तर, Curvv EV कारमध्ये 40 kWh ची बॅटरी पॉवर आहे. यातील चार्जिंगचा खर्च राज्यसरकारच्या वीज दरानुसार बदलतो.
बॅटरी वॉरंटी : इलेक्ट्रिक वाहनांचा देखभाल खर्च गॅसोलीन आणि डिझेल वाहनांपेक्षा कमी असतो. त्यानुसार, Tata Motors, Nexon EV आणि Curvv EV या दोन्ही मॉडेल्ससाठी बॅटरीची 8 वर्षांहून अधिक काळ चालणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच एका बॅटरीवर कार 1 लाख 60 हजार किमी चालणार असल्याची गॅरंटी देण्यात आली आहे.
चार्ज क्षमता : Nexon EV एकाच वेळी चार्ज केल्यावर 312 किमी पर्यंत धावण्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच Curvv EV 400 किमी पर्यंत धावू शकते. दोन्ही मॉडेल्समध्ये सुरक्षा फिचर आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी डिझाइन केले आहेत.
प्रति वर्ष खर्च : इलेक्ट्रिक कारसाठी विमा प्रीमियम सामान्यतः त्यांच्या उच्च किमतीमुळं आणि बॅटरीसारख्या महाग घटकांमुळं बदलतो. त्यामुळं काही राज्य सरकारं इलेक्ट्रिकला प्रोत्साहन देतात. ज्यामुळे विमा खर्च कमी होऊ शकतो. तज्ञांचं म्हणणे आहे की, Nexon EV आणि Curvv EV दोन्हीसाठी विम्याची किंमत दरवर्षी अंदाजे रु. 25,000 ते रु. 35,000 असू शकते. याशिवाय, Nexon EV च्या 30kWh बॅटरीचा चार्जिंग खर्च दरवर्षी किमान 10,000 ते 15,000 रुपये असेल. याचा अर्थ असा की Curvv EV कारच्या 40kWh बॅटरीसाठी दर वर्षी किमान 14,500 ते 20,000 रुपये चार्जिंग खर्च येईल. देखभाल खर्चाच्या बाबतीत, दोन्ही मॉडेल्सला 25,000 ते 30,000 खर्च येईल.
किंमत : टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत आघाडीवर आहे. Nexon EV सुरुवातीला अतिशय परवडणारी आहे. Curvv EV मध्ये वेगळे फिचर दिले आहे. ज्यामुळं गाडीची किमत थोडी वाढलीय. त्यानुसार नेक्सॉन ईव्ही कारची किंमत 14 लाख रूपये आहे. नवीन मॉडेल Curvv EV ची किंमत 20 लाख रुपये आहे.
हे वाचलंत का :