ETV Bharat / technology

वनप्लसचा प्रोजेक्ट स्टारलाइट काय आहे? कंपनीकडून भारतात सहा कोटींची गुंतवणूक - ONEPLUS PROJECT STARLIGHT

OnePlus Project Starlight : OnePlus नं भारतात प्रोजेक्ट स्टारलाइटची घोषणा केली आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनी भारतात 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

OnePlus
OnePlus (OnePlus)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 6, 2024, 3:16 PM IST

हैदराबाद OnePlus Project Starlight : OnePlus नं भारतात आपला नवीन प्रोजेक्ट Starlight जाहीर केला आहे. या नव्या प्रकल्पांतर्गत चिनी कंपनी देशात 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील तीन वर्षांत, OnePlus या गुंतवणुकीद्वारे ग्राहक सेवा आणि त्याच्या डिव्हाइसच्या टिकाऊपणासाठी काम करेल. अलीकडेच, कंपनीनं OnePlus फोनमधील डिस्प्लेच्या समस्येवर मात करण्यासाठी दुरुस्ती कार्यक्रम जाहीर केला. या प्रोग्राम अंतर्गत, OnePlus वापरकर्ते त्यांच्या फोनचा डिस्प्ले मोफत दुरुस्त करू शकतात.

काय आहे प्रोजेक्ट स्टारलाईट? : OnePlus चा हा प्रोजेक्ट स्टारलाईट भारतात येत्या तीन वर्षात भारतात आपली सेवा केंद्रे 50 टक्क्यांनी वाढवणार आहे. ही सेवा केंद्रे 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारतात उघडली जातील. तथापि, कंपनीनं आपल्या नव्यानं उघडलेल्या सेवा केंद्रांची कोणतीही विशिष्ट संख्या शेअर केलेली नाही. वनप्लसनं म्हटलं आहे की 2024 मध्ये कंपनीनं आपल्या सेवा केंद्रांची संख्या 11 टक्क्यांनी वाढवली आहे.

सेवा सुधारणार : याशिवाय चीनी कंपनी भारतीय वापरकर्त्यांचा सेवा अनुभवही सुधारणार आहे. यासाठी OnePlus वापरकर्ते लाइव्ह चॅट, व्हॉट्सॲप इत्यादीद्वारे कस्टमर केअरची मदत घेऊ शकतात. सध्या वनप्लसकडं भारतात 40 खास आणि 33 अधिकृत रिटेल स्टोअर्स आहेत. प्रोजेक्ट स्टारलाईटच्या माध्यमातून कंपनी आपल्या वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करेल.

ग्रीन लाइनसाठी आजीवन वॉरंटी : कंपनीनं वनप्लस वापरकर्त्यांना ग्रीन लाइन समस्येसाठी आजीवन वॉरंटी देण्याची घोषणा केलीय. कोणत्याही OnePlus फोनमध्ये ग्रीन लाइनची समस्या असल्यास, वापरकर्ते ती विनामूल्य बदलण्यास सक्षम असतील. चीनी कंपनी लवकरच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13 लॉन्च करणार आहे. या फोनसाठी कंपनीनं AMOLED डिस्प्लेवर अतिरिक्त सुरक्षात्मक स्तर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं यासाठी आपल्या हार्डवेअर चाचणीत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. DisplayMate A++ स्क्रीनसह भारतात लॉंच होणारा हा पहिला फोन असेल.

हे वाचंलत का :

  1. Xiaomi Pad 7 आणि Xiaomi Pad 7 Pro लवकरच लॉंच होणार
  2. Myntraची 'M-Now' सेवा सुरू, 30 मिनिटांत होणार डिलिव्हरी
  3. Realme 14x लॉंचसह संभाव्य वैशिष्ट्ये आले समोर, जाणून घ्या काय असेल खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.