हैदराबाद मिशन मौसम Mission Mausam? : आता हवामानाची अचूक माहिती योग्य वेळी उपलब्ध होणार आहे. मिशन मौसममुळं हे शक्य होणार आहे. यासाठी सरकारनं 2 हजार कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. देशाच्या हवामान खात्याला अपग्रेड करणे हा त्याचामागचा उद्देश आहे.
हवामान संकट : हवामानाच्या संकटामुळं पर्यावरणासचं स्वरूप बदललं आहे. त्यामुळ हवामानात अनिश्चितता वाढली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून पूरस्थिती निर्माण होत आहे. तसंच देशातील इतर भागात दुष्काळाचा सामना करावा लागतोय. ढगफुटीच्या घटनाही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठे पाऊल उचललं आहे. जेणेकरून हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळू शकेल. यासाठी एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीनं हवामानाची प्रत्येक माहिती गोळा करण्यात मदत होईल. या संदर्भात मिशन मौसमसाठी दोन हजार कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं आहे.
कृत्रिम ढग विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा : यामध्ये कृत्रिम ढग विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा तयार करणे, रडारची संख्या 150 टक्क्यांहून अधिक वाढवणे, तसंच नवीन उपग्रह, सुपर कॉम्प्युटर असं गोष्टीचा समावेश करणे आहे.
पुढील पाच वर्षांत काय होणार? : ही मोहीम पुढील पाच वर्षाद दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. यामध्ये निरीक्षणाचं जाळं विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये सुमारे 70 डॉप्लर रडार, चांगलं संगणक आणि 10 विंड प्रोफाइलर आणि 10 रेडिओमीटर बसवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात निरीक्षण क्षमता आणखी वाढवली जाईल. त्यासाठी उपग्रहावर भर दिला जाणार आहे.
मुख्य उद्दिष्टे काय आहेत? : मिशन मौसमचं उद्दिष्ट अल्प ते मध्यम-मुदतीच्या हवामान अंदाजांची अचूकता सुधारण्याचं आहे. यासोबतच सर्व प्रमुख महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेचा अंदाज 10 टक्क्यांनी सुधारावा लागणार आहे.
हे वाचलंत का :