हैदराबाद Meta Connect 2024 : फेसबुकनं आपल्या वार्षिक कार्यक्रम मेटा कनेक्ट 2024 मध्ये अनेक नवीन उत्पादनं लाँच केली आहेत. यासोबतच कंपनीनं आपल्या AI मॉडेल Llama ची प्रगत आवृत्ती देखील सादर केली आहे. यासोबतच कंपनीनं मिक्स्ड रिॲलिटी आणि ऑगमेंटेड रिॲलिटी डिव्हाइसेस देखील सादर केले आहेत. यात जनरेटिव्ह एआय मॉडेल्स उपलब्ध आहे. मेटा कनेक्ट 2024 मध्ये लॉन्च केलेल्या उत्पादनांबद्दल
मेटा क्वेस्ट 3S : Meta नं आपला नवीनतम हेडसेट Meta Quest 3S लाँच केला आहे. कंपनीनं हा डिवाइस $299.99 मध्ये लॉन्च केला आहे. नवीन Quest 3S च्या डिझाईनमध्ये कंपनीनं फारसे बदल केले नाहीय, पण त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले आहेत. यासोबतच Meta Horizon OS देखील अपग्रेड करण्यात आलं आहे. हे आता यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲप्सना अधिक चांगलं सपोर्ट करणार आहे.
मेटा क्वेस्ट 3 : Meta Quest 3S लाँच केल्यानंतर Meta नं Meta Quest 3 ची किंमत कमी केली आहे. आता 512GB स्टोरेजसह Meta Quest 3 $499.99 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. कंपनीनं ते $649.99 मध्ये लॉन्च केलं होतं.
मेटा ओरियन एआर प्रोटोटाइप ग्लासेस : Meta नं आपल्या AR चष्माचं घोषणा केलीय. कंपनीनं या प्रोटो-डिव्हाइसला ओरियन असं नाव दिलं आहे. मेटा ओरियन ग्लासेसद्वारे मोठ्या होलोग्राफिक डिस्प्लेमध्ये 2D आणि 3D चा अनुभव घेता येईल, असं मेटानं म्हटलं आहे. मेटाचे हे ग्लासेस हलके आणि आरामदायी डिझाइनसह लॉन्च केले जातील.
रे-बॅन मेटा स्मार्ट चष्मा अपडेट : मेटा रे-बॅन स्मार्ट ग्लासेस हे अतिशय लोकप्रिय उत्पादन आहे. कंपनीनं यात आणखी फिचर्स दिले आहेत. आता यूजर्स मेटा ग्लासवरून व्हॉट्सॲप आणि मेसेंजरवर मेसेज पाठवू शकणार आहेत. Meta AI मध्ये व्हिडिओ सपोर्ट देखील सादर करणार आहे. यासह, डिव्हाइस रिअलटाइम भाषांतर देखील समर्थन करेल, असा मेटाचा दावा आहे.
Llama 3.2 AI मॉडेल : Meta नं Llama 3.2 लहान आकाराचं AI मॉडेल आणि LLMs (11B आणि 90B) च्या मध्यम आकाराच्या आवृत्त्या सादर केल्या आहेत. हे एआय मोबाईलवर सहज चालतील असं मेटानं सांगितलं. हे मॉडेल VR, रोबोटिक्स आणि इतर ठिकाणी देखील वापरले जाऊ शकतात, असं मेटाचं म्हणणे आहे.