हैदराबाद Tips for traveling on long drive : तुम्ही तुमच्या कारमध्ये तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?. त्याचबरोबर सहलीला जाण्यापूर्वी गाडीशी संबंधित कोणत्या गोष्टी कराव्यात?. कारमध्ये काय ठेवावं? चला जाणून घेऊया प्रवासाला जाण्यापूर्वी कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
कार सर्व्हिस करा : प्रावासाला जाताना थोडासा निष्काळजीपणा प्रवासाची मजा खराब करू शकतो. तुम्ही तुमच्या कारमध्ये सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर बाहेर जाण्यापूर्वी नक्कीच त्याची सर्व्हिस करून घ्या. यामुळं कारमधील दोष लक्षात येतात. अन्यथा, प्रवासादरम्यान कोणतीही गडबड झाल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. याशिवाय वाहनाचं ब्रेक, ऑइल, वायपर, एसी, कूलंट योग्य प्रकारे काम करत आहेत, हेही तपासून घ्या.
गाडीची मूळ कागदपत्रे सोबत ठेवा : प्रवासाला जाताना वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत. अलीकडच्या काळात, जवळजवळ प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये वाहनांची कागदपत्रे जतन करून ठेवतो. प्रवासात तुमचा फोन डिस्चार्ज झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळं लांबच्या प्रवासाला जाताना वाहनाची मूळ कागदपत्रं नेहमी सोबत ठेवा.
अतिरिक्त टायर : जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तेव्हा तुमच्या गाडीत अतिरिक्त टायर म्हणजेच स्टेपनी ठेवा. तुमच्या कारमध्ये स्टेपनी आधीच इन्स्टॉल केलेले असल्यास, ते बरोबर आहे की नाही ते नीट तपासा. तुमच्या कारमध्ये स्टेपनी असल्यानं तुम्हाला अज्ञात ठिकाणी टायर पंक्चर झाल्यास, तुम्ही तो बदलून तुमचा प्रवास पुन्हा सुरू करू शकता.
जम्पर केबल्स घेऊन जा : लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी जंपर केबल्स सोबत ठेवा. तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जात असाल तर जंपर केबल्स सोबत ठेवायला विसरू नका. अनेकवेळा कारची बॅटरी संपते, त्यामुळं ती सुरू करण्यात खूप अडचणी येतात. या परिस्थितीत, जम्पर केबल्सच्या मदतीनं, आपण बॅटरी चार्ज करू शकता.
गाडीत प्रथमोपचार पेटी ठेवा : तुमचा प्रवास छोटा असो वा मोठा, कारमध्ये प्रथमोपचार पेटी (first aid box) असणं नेहमीच महत्त्वाचं असतं. या बॉक्समध्ये तुम्ही ताप, खोकला, उलट्या, डोकेदुखी, डेटॉल इत्यादी आवश्यक औषध ठेवू शकता. प्रवासादरम्यान कोणी आजारी पडल्यास, हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.
हे वाचलंत का :