ETV Bharat / technology

स्वस्तात मस्त फोन : Tecno Pop 9 4G 22 नोव्हेंबर रोजी लाँच होणार - TECNO POP 9 4G LAUNCH DATE

स्मार्टफोन निर्माता Tecno भारतात नवीन फोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आगामी Tecno POP 9 4G च्या लॉंचच्या तारखेची घोषणा केलीय.

Tecno POP 9 4G Launch Date
Tecno POP 9 4G Launch Date (Tecno)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 20, 2024, 7:50 AM IST

Updated : Nov 20, 2024, 9:40 AM IST

हैदराबाद : Tecno भारतात एक परवडणारा फोन आणत आहे. कंपनीनं Tecno POP 9 4G फोनच्या लॉंच डेटची घोषणा केलीय. ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर यासाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील लाइव्ह झाली आहे. जिथं त्याच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच किमतीबाबतही हा फोन स्वस्तात लॉंच होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉंच होण्याची अपेक्षा आहे.

लाँच तारीख आणि अपेक्षित किंमत : या स्मार्टफोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट ॲमेझॉनवर लाइव्ह झाली आहे. जिथं कंपनीनं त्याच्या बहुतेक वैशिष्ट्यांच्या तपशीलांची पुष्टी केली आहे. परवडणारा फोन भारतात 22 नोव्हेंबर रोजी लॉंच केला जाईल. लॉंच झाल्यानंतर ग्राहकांना तो Amazon वरून खरेदी करता येणार आहे. ॲमेझॉननंही या फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे संकेत दिले आहेत. हे Amazon वर X, XX9 च्या किंमतीच्या टॅगसह दिसत आहे. कंपनीचा मागचा फोन Pop 8 4G 6 हजार 499 रुपयांमध्ये लॉंच करण्यात आला होता.

3.5 मिमी ऑडिओ जॅक : Tecno Pop 9 मध्ये मध्यभागी डायनॅमिक पंच होल कटआउट असेल. डाव्या बाजूला एक सिम ट्रे असेल. उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर असेल. मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह स्क्वेरिश कॅमेरा मॉड्यूल असेल. तसंच, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक उपलब्ध असेल. Tecno Pop 9 ग्लिटरी व्हाइट, लाइम ग्रीन आणि स्टारट्रेल कलर पर्यायांमध्ये लॉंच केला जाईल.

चिपसेट : आगामी फोनमध्ये MediaTek Dimensity Helio G50 प्रोसेसर असेल. हा एक एंट्री-लेव्हल चिपसेट फोन आहे.

डिस्प्ले : यात 90 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.67-इंचाचा HD+ डिस्प्ले असेल. मागील मॉडेल 6.56-इंच स्क्रीनसह लॉंच करण्यात आलं होतं.

मेमरी : यात 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. जे 1 टीबी पर्यंत वाढवता येइल.

बॅटरी : फोन 5,000 mAh बॅटरीसह येईल आणि 840 तासांचा स्टँडबाय बॅकअप देईल. ही बॅटरी 32 तासांचा बॅकअप आणि 9.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकेल.

कॅमेरा : यात 13MP रियर कॅमेरा असेल. मागील पॉप 8 फोन 12MP कॅमेरासह लॉंच करण्यात आला होता. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP54 रेटिंग असेल. यात DTS ऑडिओ, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि IR रिमोट कंट्रोल असेल. Tecno नं गेल्या महिन्यात या फोनचा 5G प्रकार देखील लॉंच केला होता.

हे वाचलंत का :

  1. Redmi K80, K80 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक, कधी होणार लॉंच?
  2. Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर झाले लिक, फोनमध्ये 200 MP कॅमेरा
  3. माणसं पृथ्वीवर कलंक, गटारासारख्या माणसांनी आत्महत्या करावी, गुगल चॅटबॉटच्या उत्तरानं खळबळ

Last Updated : Nov 20, 2024, 9:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.