हैदराबाद : भारतात फोल्डेबल मोबाईल फोनची क्रेज आहे. हे फोन स्टायलिश लुकसह उत्कृष्ट वैशिष्ट्यांना समर्थन देतात. पण फोल्डेबल फोनची किंमत जास्त असल्यानं सर्वसामान्यांना ते विकत घेता येत नाहीत. पण आज टेक ब्रँड TECNO नं आपला स्वस्त फोल्डेबल फोन भारतात लॉंच करून एक नवीन कामगिरी केली आहे.
TECNO PHANTOM V2 सीरीज लॉंच : फोल्डेबल फोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. टेक्नोनं दोन अत्यंत स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच केलेय. कंपनीनं आज (6 डिसेंबर) भारतीय बाजारपेठेत TECNO PHANTOM V2 सीरीज लॉंच केली आहे. या सीरीजमध्ये PHANTOM V Fold 2 आणि flip-style PHANTOM V Flip 2 स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीनं हे फोन परवडणाऱ्या किमतीत लॉंच केले आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 34 हजार 999 रुपये आहे.
Tecno Phantom V2 ची फोल्डेबल किंमत : PHANTOM V Flip2 ची किंमत ₹३४ हजार ९९९ असून PHANTOM V Fold2 ची किंमत ₹79 हजार 999 रुपय ठेवण्यात आलीय. या दोन्ही फोल्डेबल फोनची विक्री भारतात 13 डिसेंबरपासून सुरू होईल. नवीन फोल्डेबल मोबाइल्स शॉपिंग साइट Amazon वरून खरेदी करता येतील.
Tecno Phantom V Fold 2 :
डिस्प्ले : Tecno Phantom V Fold 2 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.85-इंचाचा LTPO AMOLED प्राथमिक डिस्प्ले आहे. याच्या कव्हर डिस्प्लेचा आकार 6.45 इंच आहे. यावर LTPO AMOLED पॅनल देखील उपलब्ध आहे.
प्रोसेसर : हा Tecno फोन MediaTek Dimensity 9000+ chipset वर काम करतो. यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा फोन 12GB रॅमसह 512GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस तीन 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहेत. ज्यामध्ये OIS सह 50-मेगापिक्सेल प्राथमिक OmniVision 1/1.3-इंच आणि 1.2um पिक्सेल आकाराचा कॅमेरा आहे. यासह, 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा 2x ऑप्टिकल झूम आणि 20x डिजिटल झूम लेन्ससह आणि 114-डिग्री एफओव्हीसह 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी दोन 32-मेगापिक्सल कॅमेरे देखील देण्यात आले आहेत.
बॅटरी आणि चार्जिंग : Tecno Phantom V Fold 2 मध्ये मोठी 5,750mAh बॅटरी दिली आहे. फोन 70W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. यात 15W वायरलेस चार्जिंगचीही सुविधा आहे.
वजन : Tecno Phantom V Fold 2 उघडल्यावर 159 x 160.35 x 5.52 मिमी आणि दुमडल्यावर 159 x 72.16 x 11.78 चा आहे. त्याचं वजन 249 ग्रॅम आहे.
Tecno Phantom V Flip 2 :
डिस्प्ले : Tecno Phantom V Flip 2 मध्ये मागे 3.64-इंचाचा मोठा पॅनेल आहे. फोनचा प्राथमिक डिस्प्ले 6.9 इंच ठेवण्यात आला आहे. हे LTPO AMOLED पॅनेल असून फुलएचडी+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश ra, te आणि 2,160Hz PWM डिमिंगला सपोर्ट देतं.
चिपसेट : Tecno Phantom V Flip2 फोन भारतात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेटवर 6nanometer फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आला आहे. हा मोबाईल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
कॅमेरा : कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, Tecno Phantom V Flip2 मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सोबत 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. त्याच वेळी, वापरकर्त्यांना फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.
बॅटरी आणि चार्जिंग : नवीन टेक्नो फ्लिप डिव्हाइस 4,720mAh बॅटरीसह येतो. फोनला जलद चार्ज करण्यासाठी कंपनीनं 70W वायर्ड चार्जिंग सुविधा दिली आहे.
वजन : हा मोबाइल उघडल्यावर 170.74 x 73.4 x 7.64 मिमी आणि दुमडल्यावर 87.8 x 73.4 x 16.04 मिमी आहे. तर त्याचे वजन 196 ग्रॅम आहे.
हे वाचलंत का :