ETV Bharat / technology

Tata Tiago EV नं 50 हजार युनिट विक्रीचा टप्पा केला पार - TATA TIAGO EV

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक हॅचबॅक Tata Tiago EV नं 50 हजार युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठला आहे.

Tata Tiago EV
Tata Tiago EV (Tata Motors)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 26, 2024, 1:01 PM IST

हैदराबाद : स्वदेशी कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक इलेक्ट्रिक कार आहेत. भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना त्यांच्या कार खूप आवडताय. यापैकी एक कंपनीची EV हॅचबॅक Tata Tiago EV आहे, जी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Tata Tiago EV
Tata Tiago EV (Tata Motors)

50 हजार युनिट्सची विक्री : Tata Tiago EV ही कार टाटाच्या सुरुवातीच्या EV ऑफरपैकी एक आहे, जिनं आता एक नवीन टप्पा गाठला आहे. टाटा मोटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारनं लॉंच झाल्यापासून 50 हजार युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठला आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये लॉंच : ही कार भारतीय बाजारात सप्टेंबर 2022 मध्ये लॉंच करण्यात आली होती. टाटा मोटर्सच्या एकूण पाच इलेक्ट्रिक कार बाजारात विकल्या जात आहेत. त्यापैकी ही एक हॅचबॅक कार आहे. Tata Tiago EV व्यतिरिक्त, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tata Nexon EV, Tata Punch EV, Tata Tigor EV, Tata X-Press T EV आणि नवीन Tata Curvv EV यांचा समावेश आहे.

प्रकार आणि रंग पर्याय : Tata Motors पुढील वर्षी Tata Harrier EV, Safari EV, Avinya आणि Tata Sierra EV समाविष्ट करू शकते. Tata Tiago EV XE, XT, XZ+ आणि XZ+ लक्स या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही कार टील ब्लू, डेटोना ग्रे, ट्रॉपिकल मिस्ट, प्रिस्टाइन व्हाईट आणि मिडनाईट प्लम या एकूण रंग पर्यायांमध्ये विकली जात आहे.

पॉवरट्रेन आणि रेंज : Tata Tiago EV दोन बॅटरी पॅक, 19.2kWh आणि 24kWh च्या निवडीसह ऑफर केली आहे. या बॅटरी पॅकबद्दल, कंपनीचा दावा आहे की त्यांना एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानं, 275 किमी पर्यंतची रेंज मिळवता येते. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर त्याच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.