ETV Bharat / technology

शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन : डॉ. सी.व्ही. रामन यांनी संशोधनासाठी वापरलेला तबला मुख्य आकर्षण - Science City of Bangalore

SCIENCE CITY OF BANGALORE : शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन बेंगळुरू शहरात आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात तुम्हाला डॉ. सी.व्ही. रामन यांनी संशोधनासाठी वापरेला तबला देखील पहायला मिळणार आहे.

SCIENCE CITY OF BANGALORE
सायन्स सिटी ऑफ बंगलोर (बेंगळुरू)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 26, 2024, 3:03 PM IST

Updated : Aug 26, 2024, 4:22 PM IST

बेंगळुरू SCIENCE CITY OF BANGALORE : 19 व्या शतकात शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 'SCI560' 'सायन्स सिटी ऑफ बेंगळुरू सायंटिफिक हिस्ट्री' असं या प्रदर्शनाचं नावं आहे. युवकांना विज्ञान संशोधनात रुची निर्माण करण्यासाठी राज्य सरकारसह आंतरराष्ट्रीय विज्ञान गॅलरी नेटवर्कनं हेब्बल येथे "बेंगळुरू सायन्स गॅलरीचं आयोजन केलं आहे.

प्रदर्शनात सर्वसमावेशक माहिती : SCI560 या प्रदर्शनात 19व्या शतकापासून ते आजपर्यंतच्या औद्योगिक, लष्करी आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांमध्ये बंगळुरूच्या वैज्ञानिक योगदानाचं सर्वसमावेशक माहिती असेल. त्यामुळं तरुण विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा अभ्यास करता येणार आहे. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी वापरलेला टॉर्पेडो (लोखंडी भाला) या प्रदर्शनात लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. याला बेंगळुरूमध्ये डिझाइन केलंय. तत्कालीन मद्रास इंजिनियर ग्रुपनं टॉर्पेडोची निर्मिती केली होती. पहिल्या महायुद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी सैनिकांनी याचा वापर केल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.

मुन्सेल रिश्टर आकर्षण : या प्रयोगात 2019 मध्ये विविध तलावातील माती गोळा करण्यात आली. त्यात दहा वेगवेगळ्या ठिकाणी पाणी आणि बॅक्टेरिया वाढल्याचं दिसून आलं. आता सूक्ष्मजीव पुनरुत्पादन करत आहेत आणि मातीवर अवलंबून विविध आकर्षक रंग निर्माण करत आहेत.

सीव्ही रमण तबला : भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामन यांनी वाद्यांच्या कंपनांचा अभ्यास करताना संशोधनासाठी वापरलेला तबला या प्रदर्शनात आहे. ध्वनीच्या अभ्यास करणाऱ्यांना वाद्याची कंपनं आणि आवाज अनुभवण्याची संधी यातून मिळतेय.

बेंगळुरू संगणक : 2001-2003 दरम्यान संगणकाचा शोध भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेंगळुरू यांनी लावला होता. यामुळं शास्त्रज्ञांना काम करण्याची चांगली संधी मिळाली होती. तेव्हा संगणकाचा वापर करताना कीबोर्डची आवश्यकता नव्हती.

विविध प्रयोगशाळा : सायन्स गॅलरीत राष्ट्रीय विज्ञान जंतू मॉडेल, टेलिफोनचा आविष्कार, बेंगळुरूचे मॅपिंग, तलावांचं क्रॉनिकल्स, माइंड अँड मशिन्स, कॉस्मिक रे, शहरातील टपाल तिकिटं, इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्समिट करणं इत्यादींसह बंगलोरमधील पक्ष्यांचं ध्वनी संकलन यासह, असे एकून 30 मॉडेल प्रदर्शनात पहाता येणार आहे.

विनामूल्य प्रवेश : या प्रदर्शनात सामान्य लोकांना विनामूल्य प्रवेश आहे. कार्बन सायन्स गॅलरी सोमवार आणि मंगळवार वगळता बुधवार ते रविवार खुली असेल. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांना प्रदर्शन पहाता येणार आहे. 12 सदस्यांची विशेष टीम कन्नड आणि इंग्रजीमध्ये विज्ञान मॉडेल समजावून सांगणार आहे.

हे वाचलंत का :

  1. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor
  2. भारतानं पहिलं हायब्रिड रॉकेट 'RHUMI-1' केलं लाँच - Reusable Hybrid Rocket RHUMI 1

Last Updated : Aug 26, 2024, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.