हैदराबाद : भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, सॅमसंगनं Galaxy M05 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या लोकप्रिय Galaxy M मालिकेतील आवृत्ती आहे. यात उत्कृष्ट कॅमेरा असून परवडणाऱ्या किंमतीत हा फोन तुम्ही खरेदी करु शकता.
“Galaxy M05 हे तरुण ग्राहकांसाठी डिझाइन केलेला फोन आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा, 25W जलद चार्जिंगसह दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये जबरदस्त 6.7″ HD+ डिस्प्ले या असून उत्तम कॅमेरा आहे. या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह, Galaxy M05 एंट्री-लेव्हल स्मार्टफोन्समध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.” - MX बिझनेस हेड राहुल पाहवा, सॅमसंग इंडिया
उत्तम कॅमेरा : Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यामुळं अधिक चागंले फोटो काढता येतात. यात एपर्चर F/1.8 सह उच्च-रिझोल्यूशन 50MP वाइड-एंगल लेन्स कमी प्रकाशातही आकर्षक प्रतिमा कॅप्चर करतो. तर 2MP डेप्थ-सेन्सिंग कॅमेरा स्पष्ट प्रतिमा कॅप्चर करतो. 8MP फ्रंट कॅमेरा तुमचे सेल्फी उत्तम प्रकारे कॅच करतो.
दीर्घकाळ टिकणारी बॅटरी : Galaxy M05 मध्ये 5000 mAh बॅटरी आहे. जी फोनला दीर्घकाळ काम करण्यास मदत करते. तुम्ही स्ट्रीमिंग करत असाल, गेमिंग करत असाल किंवा बिन्ज-वॉचिंग करत असाल, 25W फास्ट चार्जिंग वैशिष्ट्य तुम्हाला तुमचा स्मार्टफोन नेहमी चालू ठेवण्यास मदत करेल.
जबरदस्त डिस्प्ले : Galaxy M05 मोठ्या 6.7-इंच HD+ डिस्प्लेसह येतो. मोठा स्क्रीन टेक Gen Z ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतं.
कामगिरी : Galaxy M05 फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हा प्रोसेसर मल्टीटास्किंगसाठी अनुमती देतो. त्यामुपळं वापरकर्त्ये एकाधिक ॲप्स सहज चालवू शकता.
मेमरी प्रकार, किंमत आणि उपलब्धता : Galaxy M05 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. तसंच यामध्ये 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. हे उपकरण आकर्षक मिंट ग्रीन रंगात लॉंच करण्यात आलं आहे. Galaxy M05 Amazon, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअरवर उपलब्ध असेल. या फोनच 4GB+64GB व्हेरिंयट तुम्ही 7 हजार 999 रुपयात खरेदी करु शकता.
हे वाचलंत का :