हैदराबाद : Redmi K80 सीरीजसोबत Xiaomi ब्रँडनं मिड-रेंज स्मार्टफोनसह, दोन इतर नवीन उत्पादनं देखील सादर केली. यात रेडमी वॉच 5 आणि रेडमी बड्स 6 प्रोचा समावेश आहे0. स्मार्टवॉच आणि वायरलेस बड दोन्ही आता चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, परंतु येत्या काही महिन्यांत इतर देशांमध्ये लॉंच दोन्ही प्रोडक्ट लॉंच होण्याची अपेक्षा आहे. रेडमी वॉच 5 दोन काळा आणि चांदी रंगामध्ये उपलब्ध आहे.
लेदर मॅग्नेटिक स्ट्रॅप : वॉच 5 मध्ये 1,500 निट्स पीक ब्राइटनेस, 432 x 514 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह मोठा 2.07-इंच AMOLED वक्र डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये 82 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि अतिशय पातळ 2mm बेझल्स आहे, असा Redmi चा दावा आहे. कोना लेदर मॅग्नेटिक स्ट्रॅपसह, स्मार्टवॉमध्ये सात स्ट्रीप पर्याय देखील मिळतील. ही वॉच HyperOS 2 द्वारे समर्थित आहे. त्यात स्मार्ट कार कार्यक्षमता आणि मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीसह NFC (नियर फील्ड कम्युनिकेशन) मिळेल. रेडमी वॉचमध्ये 5550 mAh बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 24 दिवसांपर्यंत बॅटरी टीकते, परंतु स्मार्टवॉचची eSIM आवृत्ती केवळ 12 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते देते. eSIM मॉडेल स्टँडअलोन कॉल, संदेश, 25 तासांपर्यंत वॉकी-टॉकीची परवानगी देते.
Redmi Buds 6 Pro वायरलेस बड्स : दुसरीकडं, Redmi Buds 6 Pro वायरलेस बड्स काळा, जेड ग्रीन आणि व्हाइट अशा तीन रंगामध्ये उपलब्ध आहेत. ज्या ग्राहकांना काहीतरी नवीन प्रोडक्ट हवं आहे, ते बड्स 6 प्रो गेमिंग एडिशन खरेदी करू शकता. डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर नवीन Redmi Watch 5 एक प्रकारे Apple Watch सारखीच आहे. ॲल्युमिनियम मिश्र धातुची फ्रेम आणि स्टेनलेस स्टीलचा फिरणारा मुकुट असलेले, Redmi वॉच 5 खूपच स्टाइलिश दिसते. रेडमीच्या नवीन वायरलेस बड्समध्ये 11 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि व्हाइस कॅन्सलेशन (ANC) आहे. नवीन बड्स LHDC 5.0, Bluetooth 5.3 आणि LC3 ऑडिओ कोडेक्सला सपोर्ट करतात. Buds 6 Pro ची बॅटरी 36 तासांपर्यंत बॅटरी टीकते,असा दावा रेडमीनं केलाय.
हे वचालंत का :