हैदराबाद : Realme आपला GT 7 Pro स्मार्टफोन 4 नोव्हेंबरला चीनमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीनं या महिन्याच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत हा फोन लॉंच करण्याचे संकेत दिले आहेत. जागतिक बाजारपेठेत लॉंच होणारा हा पहिला फोन असेल, जो कार्यक्षमतेसाठी क्वालकॉमच्या नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरनं सुसज्ज असेल. Realme नं अनेक टीझर्सद्वारे फोनच्या तपशीलांची पुष्टी केली आहे, परंतु मुख्य वैशिष्ट्ये अद्याप समोर आलेली नाहीत. आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये कोणते फीचर्स दिले जाऊ शकतात?, तो भारतात कधी लॉंच केला जाईल? चला जाणून घेऊया...
Realme GT 7 Pro चे तपशील : GT 7 Pro मध्ये 2780 x 1264 पिक्सेलच्या उच्च रिझोल्यूशनसह मोठा 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. यात 450ppi ची पिक्सेल घनता आणि 6000 nits पीक ब्राइटनेसला 120Hz रिफ्रेश रेटसह असेल. मार्स एक्सप्लोरेशन एडिशन, लाइट डोमेन व्हाइट आणि स्टार ट्रेल टायटॅनियम देखील यात असण्याची शक्यता आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज प्रकार : या फोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असल्याची पुष्टी आधीच झाली आहे. यात क्वालकॉमचा कस्टम ओरियन कोअर CPU आहे, ज्याचा टॉप क्लॉक स्पीड 4.32GHz आहे. Realme ही चिप 12GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजसह आणेल.
कॅमेरा सेटअप : एका अहवालात GT 7 Pro मध्ये मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सिस्टम आहे. ज्यात f/1.88 अपर्चरसह 50MP वाइड-एंगल लेन्स आहे. 50MP दुय्यम सेन्सर आणि 8MP टेलिफोटो लेन्स त्यात जोडली जाऊ शकते. सेल्फीसाठी यात 16MP लेन्स असण्याची अपेक्षा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग : याफोनमध्ये पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 6500mAh असून 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन Android 15 वर Realme च्या कस्टम UI 6 वर चालेल. फोनच्या बाकीच्या वैशिष्ट्यांमध्ये USB-C पोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, GPS, ड्युअल सिम सपोर्ट आणि 5G कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.
Realme GT 7 Pro किंमत : भारतात Realme GT 7 Pro ची किंमत 50 हजार ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, अशी अपेक्षा आहे. भारतातील ब्रँडचा शेवटचा फ्लॅगशिप Realme GT 2 Pro होता, ज्याची किंमत 49 हजार 999 रुपये होती. चीनमध्ये या फोनची किंमत CNY 3,599 (अंदाजे 42 हजार 500 रुपये) पासून सुरू होऊ शकते.
हे वाचलंत का :