हैदराबाद : Realme 14x लवकरच भारतात लॉंच होऊ शकतो. Realme 14x IP69 रेटिंगसह येण्याची अपेक्षा आहे. यात 6000mAh बॅटरी देखील मिळू शकते. फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेजनुसार तीन कॉन्फिगरेशन आणि तीन रंग पर्यायांमध्ये येईल. Realme 14x 18 डिसेंबर रोजी अधिकृतपणे लॉंच होण्याची अपेक्षा आहे.
Realme 14x सेल : भारतात Realme 14x ची विक्री 18 डिसेंबरपासून सुरू होईल. या फोनची अपेक्षित किंमत 14 हजार 990 असण्याची शक्यता आहे. मात्र, फोन लॉंच नंतरच खरी किंमत समोल येईल. फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी IP69-रेटेड बिल्डसह येईल. यात 6000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. Realme 14x मध्ये 6.67-इंचाचा HD Plus डिस्प्ले आणि मागील Realme फोन्सप्रमाणे डायमंड-कटिंग डिझाइन असण्याची अपेक्षा आहे.
तीन रंग पर्याय : Realme 14x फोन तीन प्रकारांमध्ये येईल. यात 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB असे पर्याय असतील. हा फोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो, डब्ल्यू आणि ज्वेल रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असल्याचं सांगितलं जातंय.
Realme 14x 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये : कंपनी Realme 14x ला Realme 12x 5G मध्ये अपग्रेड म्हणून आणत आहे. त्यामुळं 14x मध्ये बरेच अपग्रेड पाहिलं जाऊ शकतात. Realme 12x 5G भारतात या वर्षी एप्रिलमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायांसह 11 हजार 999 रुपयांमध्ये लॉंच करण्यात आला होता.
चला जुन्या मॉडेलच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया : Realme 12x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच फुल एचडी प्लस IPS LCD आहे. हा फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटवर चालते. यात 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. Realme 12x 5G फोन 45W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात 5000mAh असून धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी फोन IP54 रेटिंगसह येतो. फोनमध्ये डायनॅमिक बटणं देखील आहेत. यात मिनी कॅप्सूल 2.0 वैशिष्ट्य आहे, जे डिस्प्लेवरील होल-पंच कटआउटच्या आसपास ॲनिमेशनद्वारे वापरकर्त्याचे कॉल, चार्जिंग आणि इतर महत्त्वपूर्ण सूचना दर्शवतं.
हे वाचलंत का :