हैदराबाद : Realme लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे. या फोनचं नाव Realme 14x 5G असं असणार आहे. कंपनीनं या फोनच्या डिझाईन आणि कलर्सची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा फोन Realme 12x 5G ची पुढील आवृत्ती असेल. हा फोन बाजारात दाखल होणार आहे. त्यात काय विशेष पाहायला मिळणार याची उत्सुकता लोकांना आहे. आम्ही तुम्हाला या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार आज माहिती देणार आहेत. चला तर जाणून घेऊया फोनचे फीचर आणि किंमत...
Realme 14x 5G 18 डिसेंबर रोजी लॉंच : कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून फोनबद्दल माहिती शेअर केली आहे. तसंच कंपनीनं फोनचा टीझर व्हिडिओ दुसऱ्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन भारतात 18 डिसेंबर 2024 रोजी लॉंच केला जाईल.
A killer combo of power and durability! Say hello to India’s First IP69 under 15K. Are you ready for the #Dumdaar5GKiller with #realme14x5G?
— realme (@realmeIndia) December 11, 2024
Launch & Sale on 18th Dec, 12 PM.
Know more: https://t.co/9LHPpphjlbhttps://t.co/harpyyPzPW pic.twitter.com/3CnCKFno2j
काय असणार किंमत : Realme 14x 5G ची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तसंच, या किंमत श्रेणीमध्ये IP69 रेटिंगसह येणारा हा पहिला फोन असेल. कंपनीनं शेअर केलेला टीझर फोनच्या रंग आणि डिझाइनबद्दल आहे. हा फोन काळ्या, सोनेरी आणि लाल रंगात लॉंच केला जाईल.
बाजूस तीन कॅमेरे : फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आणि एलईडी फ्लॅशलाइटसह एक आयताकृती मागील कॅमेरा मॉड्यूल असेल. हा सेटअप मागील मॉडेल Realme 12x मधील अपग्रेड असेल. या फोनमध्ये 6.67-इंच HD + IPS LCD स्क्रीन असू शकते. फोन 6GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज अशा तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. फोनमध्ये शक्तिशाली 6,000mAh बॅटरी मिळू शकते. Realme 14x 5G त्याच्या मागील मॉडेल Realme 12x पेक्षा अधिक चांगला असू शकतो. Realme 12X या वर्षी एप्रिलमध्ये 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉंच करण्यात आला होता.
हे वचालंत का :