हैदराबाद IRCTC Changes Reservation Rules : जर तुम्ही भारतीय रेल्वेचं आयआरसीटीसी ॲप किंवा वेबसाइटवरून रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेन आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंगचे नियमात बदल केला आहे. त्यामुळं प्रवासी आता फक्त 60 दिवस आधी रेल्वे तिकीट बुक करू शकतात. यापूर्वी भारतीय रेल्वेनं 120 दिवस अगोदर रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा दिली होती. आता ती 60 दिवसांवर आणली आहे. हे नियम काय आहेत?, कधी पासून लागू होणार आहे?, जाणून घेऊया...
1 नोव्हेंबर 2024 पासून नियम लागू : भारतीय रेल्वेचे टिकीट बुकिंगचे नवे नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. आगाऊ ट्रेन तिकीट बुकिंगसाठी हा नवीन नियम लागू होईल. आधीच बुक केलेल्या तिकिटांवर याचा परिणाम होणार नाही. तुम्ही आगाऊ रेल्वं तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नवीन नियम माहित असणं आवश्यक आहे, अन्यथा, तुम्हाला कन्फर्म ट्रेन तिकीट मिळण्यात अडचण येऊ शकते.
AI प्रणालीचा वापर : प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय रेल्वे झपाट्यानं हायटेक होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये एआय AI प्रणाली बसवण्यात येत आहे. ज्यामुळं सीट उपलब्धता, ट्रेनमधील तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेत सुधाणा होईल. आयआरसीटीसी ॲप एआयच्या मदतीनं सीट उपलब्धतेच्या टक्केवारीची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
एआय आधारित कॅमेरे : रेल्वेनं यापूर्वी प्रत्येक स्थानकासाठी निश्चित केलेल्या आसन नियमांमध्ये बदल केले आहेत. आता एआयच्या मदतीनं कोणत्या स्टेशनला जागांची सर्वाधिक मागणी आहे, याचा शोध घेतला जात असून त्यानुसार जागा निश्चित केल्या जात आहेत. त्यामुळं कन्फर्म सीट मिळणं सोपं होतं. याशिवाय भारतीय रेल्वेकडून एआय-आधारित कॅमेरे बसवले जात आहेत.
IRCTC वर आयडी कसा तयार करायचा :
- IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
- एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यावर नाव, लिंग, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा.
- तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकावा टाका.
- यानंतर तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि लॉगिन पासवर्ड टाका.
- पत्ता आणि पिन कोड नंतर कॅप्चा टाका.
- नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
- अशा प्रकारे IRCTC आयडी जनरेट होईल.
ट्रेनचं तिकीट ऑनलाइन कसं बुक करावं :
- IRCTC वेबसाइटवर लॉग इन करा.
- बुक युवर तिकीट या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हा कुठं जायचं त्याची माहिती भरा .
- त्यानंतर तुम्हाला ज्या तारखेला प्रवास करायचा ती तारीख निवडा. त्यानंतर प्रवासी वर्ग निवडावा लागेल.
- त्यानंतर ट्रेन आणि बुक नाऊ पर्यायावर टॅप करा.
- यानंतर, प्रवाशाचा तपशील प्रविष्ट करावा लागेल.
- त्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.
हे वाचलंत का :