हैदराबाद Prasar Bharati OTT platform launch : प्रसार भारतीनं 55 व्या IFFI गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात OTT प्लॅटफॉर्म लाँच केला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) उद्घाटन समारंभात प्रसार भारतीच्या ‘WAVES’ OTT प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला. Waves नावाच्या या प्लॅटफॉर्मवर 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा मिळणार आहेत. प्रसार भारतीनं आपल्या X खात्यावर पोस्ट करून OTT प्लॅटफॉर्म लॉंच करण्याबाबत माहिती दिली आहे.
Prasar Bharati launches the #WAVES #OTT platform at #IFFI !
— PIB India (@PIB_India) November 20, 2024
The platform aims to revive nostalgia while embracing modern digital trends by offering a rich mix of classic content and contemporary programming #IFFI2024 #IFFI55
(1/3) pic.twitter.com/3l3DlRNSE4
'प्रसार भारतीनं इफ्फीमध्ये WAVES OTT प्लॅटफॉर्म लॉचं केला. क्लासिक कंटेंटसह प्रगत डिजिटल ट्रेंडचा अवलंब करून जुन्या आठवणी ताज्या करणं हे व्यासपीठाचं लक्ष्य आहे.' - प्रसार भारती
ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणार या सुविधा : X खात्यावर पोस्ट कलेल्या पोस्टमध्ये प्रसार भारतीनं याची सविस्तर माहिती दिली आहे. मागणीनुसार व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ ऑनलाइन स्ट्रीमिंग, थेट टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनेल आणि व्हिडिओ आणि गेमिंग सामग्री असेल, असं त्यात लिहलं आहे. या सुविधा 12 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असतील. प्रसार भारतीच्या मते, वेव्हजचा डिजिटल वापर वापरकर्त्यांसाठी सोपा असेल.
Waves Netflix सह Jio सिनेमाशी स्पर्धा : OTT च्या या युगात, आधीच भरपूर OTT प्लॅटफॉर्म आहेत. Netflix, Jio Cinema, Prime Video, Disney Plus Hotstar Zee5, आणि Sony Liv सारखे OTT प्लॅटफॉर्मला लोकांची पसंती आहे. अलीकडे जिओ सिनेमा आणि हॉटस्टार JioStar.com एकत्र आले आहेत. त्यामुळं प्रसार भारतीचं Waves च्या प्रवेशानंतर, या OTT प्लॅटफॉर्मसाठी स्पर्धा वाढली आहे.
हे वाचलंत का :