ETV Bharat / technology

आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - Muft Bijli Yojana

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 19 hours ago

Updated : 12 hours ago

Muft Bijli Yojana : शाश्वत ऊर्जेला चालना देण्यासाठी भारत सरकारनं मोफत वीज योजना सुरू केलीय. या योजनेचा उद्देश सबसिडीसह 1 कोटींहून अधिक कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी कसा अर्ज करावा?, या योजनेचे काय फायदे आहेत, चाला जाणून घेऊया...

Representative photograph
प्रातिनिधीक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

हैदराबाद Muft Bijli Yojana : भारत सरकारनं 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. ज्यामुळं नागरिकांना मोफत वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेचा खर्च 75 हजार 21 कोटी रुपये असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता.

नागरिकांना मिळते मोफत वीज : प्रधानमंत्री सुर्य मुफ्त बिजली योजना ही भारत सरकारची एक सरकारी योजना आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना मोफत वीज मिळते. या योजनेंतर्गत घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्यासाठी अनुदान दिलं जातं. या योजनेशी संबंधित काही खास गोष्टी आज आपण पाहूयात..

PM Surya Ghar Muft Bijli Yojana
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना (GOV website)

नोंदणी : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला pmsuryaghar.gov.in किंवा (https://www.pmsuryaghar.gov.in) या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. या साइटवर, तुम्ही तुमचं राज्य निवडून, तुमच्या वीज वितरण कंपनीचे तपशील करा. नंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी देऊन नोंदणी करावी. ही माहिती भरणं झाल्यानंतरच तुमची नोंदणी केली होईल.

लॉगिन करा आणि अर्ज करा : नोंदणी पूर्ण केल्यानंतर, तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबर वापरून लॉग इन करा. त्यानंतर हे पोर्टल तुम्हाला रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्याबाबतच्या ऍप्लिकेशनद्वारे मार्गदर्शन करेल. यामध्ये तुमच्या उर्जेच्या गरजांवर आधारित प्रणालीचा आकार निवडावा लागणार आहे. विशेषत: 3 kW पर्यंत, जे सरकारी अनुदानासाठी पात्र त्यांनी राज्यानं मान्यता दिलेल्या सूचीमधून नोंदणीकृत सेलर निवडावा.

अर्जाची पडताळणी : एकदा तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमची स्थानिक वीज वितरण कंपनी (DISCOM) तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. तुमचं घर सौर पॅनेलच्या कनेक्शन योग्य असल्यास विशिष्ट आवश्यकतांनुसार तुमच्या अर्जाला मंजूरी मिळेल. काही आठवड्यांत ही मंजूरी मिळते.

सौर पॅनेलची स्थापना : मंजूरी मिळाल्यावर, तुम्ही नोंदणीकृत विक्रेत्यांपैकी एकाकडून सौर पॅनेलच घरावर बसवावं लागेल. अनुदानासाठी पात्र ठरण्यासाठी या विक्रेत्याची नोंदनी आवश्यक असेल.

नेट मीटरिंगसाठी अर्ज करा : एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तुम्हाला नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. हे उपकरण तुमच्या सौर पॅनेलद्वारे उत्पादित केलेली ऊर्जा आणि ग्रीडमधून वापरण्यात येणारी वीज नोंदवते. या सेटअपसह, निर्माण झालेली कोणतीही अतिरिक्त ऊर्जा डिस्कॉमला परत विकली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त विजेपासून कमाई करता येते.

सबसिडी वितरण : DISCOM द्वारे नेट मीटर स्थापित केल्यानंतर एक कमिशनिंग अहवाल तयार केला जातो. या टप्प्यावर, सबसिडीची रक्कम थेट तुमच्या खात्यात प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे बँक तपशील, रद्द केलेला चेक पोर्टलद्वारे सबमिट करणं आवश्यक आहे. 3 kW प्रणालीसाठी अनुदान 78 हजार रुपयांपर्यंत असू शकतं. हे अनुदान 30 दिवसांच्या आत वितरित केलं जातं.

योजनेचे फायदे : हा उपक्रम केवळ विनामूल्य वीज तुम्हाला देत नाही, तर वीज बिलाच्या खर्चात बचत देखील करतो. ज्यामुळं ग्राहकांचे वीज बिलाचे पैसे वाचतात. उदाहरणार्थ, मासिक 300 युनिट वीज वापरणारे कुटुंब 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून वर्षाला अंदाजे 15 हजार रुपयांची बचत करू शकतात.

याव्यतिरिक्त, ही योजना 2 kW पर्यंतच्या सिस्टीमसाठी 60% सबसिडी आणि 2 ते 3 kW च्या दरम्यानच्या सिस्टीमसाठी 40% सबसिडी देते. सुरुवातीला तुमच्या घरावर सैर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी तारण-मुक्त कर्ज देखील उपलब्ध आहेत.

हे वाचलंत का :

  1. रेडमी वॉच 5 लाइटची दमदार एंट्री, 18 दिवसांपर्यंत टिकते बॅटरी - Redmi Watch 5 Lite Launched
  2. Tata Nexon CNG फक्त 8.99 लाख रुपयांना, Nexon मिळतोय बंपर डिस्काउंट - Tata Nexon CNG launched
  3. BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन, ग्राहकांना मिळतोय 1 GB दैनिक डेटा - Cheapest plan of BSNL

Last Updated : 12 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.