न्यूयॉर्क (अमेरिका) Prime Minister Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह (सीईओ) यांच्या "सार्थक" गोलमेज परिषदेत भाग घेतला. यादरम्यान त्यांनी विकासाच्या मुद्यावर भर दिला. भारतात आणि विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या उपक्रमांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
सीईओसोबत मोदींची बैठक : मोदींच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी 'लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेल'मध्ये ही बैठक झाली. AI, 'क्वांटम कंप्युटिंग' आणि 'सेमीकंडक्टर' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या 15 आघाडीच्या यूएस कंपन्यांचं सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते.
मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केलं, की "न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंसोबत सार्थक गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि इतर विषयांशी संबंधित पैलूंवर चर्चा केली. तसंच या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. भारताचा आशावादी दृष्टीकोन पाहून मला आनंद होत आहे.”
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शिखर परिषदेदरम्यान मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (ICET) सारखे प्रयत्न हे भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणाचा गाभा आहे. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कंपन्यांना सहकार्य आणि नाविन्यपूर्णतेच्या दृष्टीनं भारताच्या विकासाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे.
नवकल्पनांना चालना : बौद्धिक मालमत्तेचं संरक्षण आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देण्यासाठी भारतात होत असलेल्या आर्थिक परिवर्तनावर मोदींनी प्रकाश टाकला. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान उत्पादन आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात. भारताला "सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचे जागतिक केंद्र" बनवण्यासाठी त्यांचं सरकार वचनबद्ध असल्याचं मोदींनी म्हटलं.
AI चा प्रचार करण्यावर भर : देशाला 'बायोटेक पॉवरहाऊस' म्हणून विकसित करण्यासाठी भारताच्या 'बायो E3' (पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान) धोरणाबद्दलही त्यांनी सांगितलं. AI विषयावर ते म्हणालं की, भारताचं धोरण सर्वांसाठी AI चा प्रचार करण्यावर आणि त्याचा नैतिक आणि जबाबदारीनं वापर करण्यावर आधारित आहे. यावेळी उपस्थित CEO नी जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या वर्चस्वाचं कौतुक केलं. भारतासोबत गुंतवणूक आणि सहकार्य करण्यातही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली.
या कंपन्याचे सीईओ उपस्थित : “कंपन्या भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासातील संधींचा फायदा घेऊ शकता. भारतात सह-विकसित, सह-डिझाइन आणि सह-उत्पादन कंपन्या करू शकतात,” निवेदनात म्हटलं आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) स्कूल ऑफ इंजिनीअरिंगद्वारे आयोजित, या परिषदेला Google CEO सुंदर पिचाई, Adobe CEO शंतनू नारायण, Accenture CEO ज्युली स्वीट आणि NVIDIA CEO जेन्सेन हुआंग यांच्यासह अमेरिकेच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झालेल्या इतरांमध्ये AMD CEO Lisa Su, HP Inc. CEO Enrique Lores, IBM CEO अरविंद कृष्णा, Moderna चेअरमन डॉ. Noubar Afyan आणि Verizon CEO हंस वेस्टबर्ग यांचा समावेश होता.
हे वाचलंत का :