हैदराबाद PM kisan 18th installment : पीएम किसान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित केलीय. आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचं अनुदान दिलं आहे. तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं स्टेटस पहायचं असल्यासं दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.
PM KISAN 18वा हप्ता : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये PM-KISAN सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलाय. या योजनेअंतर्गत 20 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली. पीएम किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6 ची आर्थिक मदत सरकार करतंय. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
पीएम किसान योजना के तहत केंद्र सरकार हर चार महीने में ₹6000 रुपए की धनराशी तीन समान किस्तों में पात्र किसानों के बैंक अकाउंट में ट्रांसफर करती है और अब तक सरकार 18 किस्त किसानों को जारी कर चुकी है। यदि आप अपना स्टेटस चेक करना चाहते हैं तो दिए गए विकल्पों को जरूर अपनाएं।… pic.twitter.com/csgCQrJacr
— Agriculture INDIA (@AgriGoI) October 5, 2024
17 वा हप्ता जूनमध्ये जमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. याअंतर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. आता 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (pmkisan.gov.in) भेट द्यावी लागणार आहे.
- तिथं गेल्यावर होमपेजवरील "फार्मर्स कॉर्नर" विभागात "लाभार्थी स्थिती" लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करा.
- त्यानंतर इथं तुम्हाला तुमची पेमेंट स्थिती दिसेल.
- तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले की, नाही ते सर्व तुम्ही इथं पाहू शकता.
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ : PM KISAN योजना भारतातील लहान शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राबण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडं 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे वार्षिक सहा हजार रुपय दिले जातात. जगातील सर्वात मोठी थेट लाभ योजना आहे.
हे वाचलंत का :