हैदराबाद Oppo A3x 4G Launch : Oppo नं भारतात आपला नवीनतम बजेट स्मार्टफोन Oppo A3x 4G लॉंच केला आहे. Oppo A3X चं 4G व्हेरियंट भारतात मोठ्या 5100mAh बॅटरी, Snapdragon 6s Gen 1 चिपसेट आणि 4 GB RAM सह उपलब्ध करून देण्यात आलं आहे. Oppo A3x 4G मध्ये Android 14, 6.67 इंच मोठी LCD स्क्रीन आहे. जाणूण गेऊया फोनमध्ये काय आहे खास?
काय आहे Oppo A3x 4G ची किंमत : Oppo A3X 4G चा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 8 हजार 999 रुपयांना लॉंच करण्यात आला आहे. तर 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. हँडसेट नेबुला रेड आणि ओशन ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल. फोन ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. हँडसेटची विक्री 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Oppo A3x 4G फिचर : Oppo A3X 4G मध्ये 6.67 इंच मोठी HD+ LCD स्क्रीन आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर 90 Hz आहे. तसंच कमाल ब्राइटनेस 100 nits पर्यंत आहे. हा फोन Android 14 आधारित ColorOS सह येतो. फोनमध्ये octa-core Snapdragon 6s Gen 1 चिपसेट आहे. हँडसेटमध्ये 4 GB पर्यंत रॅम आहे. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 128 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येतो.
8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा : फोटो आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Oppo स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे, जो अपर्चर F/2.0 सह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS कनेक्टिव्हिटी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक पर्याय आहेत.
5100mAh बॅटरी : फोनमध्ये e-compass, proximity sensor, accelerometer आणि ambient light sensor आहे. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, एक मोठी 5100mAh बॅटरी प्रदान केली आहे, जी 45W चार्जिंगला समर्थन देते. डिव्हाइसची 165.77×76.08×7.68mm चा असून वजन 186 ग्रॅम आहे.
हे वाचलंत का :