हैदरबाद : ओपनएआयनं टेक्स्ट टू व्हिडिओ टूल सोरा टर्बो लाँच केलं आहे. सोरा टर्बो याआधी सोरा नावानं सादर करण्यात आलं होतं परंतु आता अंतिम लॉन्चिंगमध्ये ते सोरा टर्बोसह सादर करण्यात आलं आहे. यामुळं वापरकर्त्यांना थेट मजकूर लिहून व्हिडिओ तयार करता येणार आहे. ओपनएआयनं दावा केला आहे की सोरा टर्बोचे व्हिडिओ वास्तविक असतील, तथापि लॉन्चिंग दरम्यान देखील आम्ही सोरा टर्बोची व्हिडिओ गुणवत्ता पाहिली आहे, जी आश्चर्यकारक आहे.
we are launching sora today, and we made a new product to go with it.
— Sam Altman (@sama) December 9, 2024
if you have an openai plus or pro account, you can generate videos. anyone can view them.
it will take some time to roll out, but by the end of the day it should be available at https://t.co/VZBcJFqChS
"आम्ही आज सोरा लाँच करत आहोत. तुमच्याकडं Openai Plus किंवा Pro खाते असल्यास, तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता. त्यांना कोणीही पाहू शकतो. रोल आउट होण्यास थोडा वेळ लागेल"- सॅम ऑल्टमन, CEO of OpenAI
सोरा टर्बो : Sora Turbo आता sora.com वर उपलब्ध आहे. ChatGPT Plus आणि Pro मध्ये सध्या तुम्ही विनामूल्य वापरू शकत नाही. मात्र, सोरा टर्बो आता प्रत्येकासाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे, ग्राहक 1080p रिझोल्यूशनमध्ये 20 सेकंदांपर्यंत व्हिडिओ बनवू शकतात. व्हिडिओ तयार करण्यासाठी वाइडस्क्रीन, वर्टिकल आणि स्क्वेअर सारखे फॉरमॅट उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे प्लस आणि प्रो यूजर्सला यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.
सोरा टर्बो प्रमुख वैशिष्ट्ये : वापरकर्ते नवीन मजकूर, कल्पना वापरून व्हिडिओ तयार करू शकतात, रीमिक्स करू शकतात. याव्यतिरिक्त, स्टोरीबोर्ड इंटरफेसमधील नवीन साधनांसह, फ्रेम-बाय-फ्रेम तपशील अचूकपणे परिभाषित केले जाऊ शकतो. सोरा टर्बो सध्या EU, UK आणि स्वित्झर्लंडमध्ये उपलब्ध करून दिलेलं नाही, परंतु ChatGPT द्वारे सेवा दिलेल्या इतर प्रदेशांमध्ये ते लॉंच करण्यात आलं आहे. हे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी मुलांना वापरता येणार नाहीय.
हे वाचलंत का :