ETV Bharat / technology

OpenAI डिसेंबरपर्यंत ओरियन AI मॉडेल लॉंच कण्याची शक्यता - ORION AI MODEL

OpenAI पुढील वर्षी AI ओरियन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. OpenAIचा नविन प्रकल्प ओरियन GPT-4 पेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता आहे.

OpenAI
OpenAI (OpenAI)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 25, 2024, 2:53 PM IST

हैदराबाद : OpenAI नं या वर्षी डिसेंबरमध्ये AI ओरियन मॉडेल पुढील आवृत्ती रिलीज करण्याची योजना आखत आहे. हे मॉडेल GPT 4 पेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. OpenAI नं अलीकडील दोन AI मॉडेल्स, GPT-4o आणि o1 च्या रिलीज केले होते. सुरुवातीला, ChatGPTचं ओरियन मॉडेल सर्वांना उपलब्ध करून दिलं जाणार नाही, असा दावा द व्हर्जच्या अहवालात करण्यात आला आहे.

Azure वर ओरियन होस्ट करण्याची तयारी : सूत्रांचा हवाला देत वृत्तानुसार, OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन स्थापित एआय स्टार्टअपचं उद्दिष्ट सुरुवातीला कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश करणं आहे. जेणेकरून त्यांची वैशिष्ट्ये आणि उत्पादनं विकसित करू शकतील. ओपनएआयचे सीईओ ऑल्टमन यांनी अद्याप या अहवालावर भाष्य केलेलं नाही. मायक्रोसॉफ्ट "नोव्हेंबरच्या सुरुवातीस Azure वर ओरियन होस्ट करण्याची तयारी करत आहे", असा अहवालात दावा करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टनंही याला प्रतिसाद दिलेला नाहीय.

आणखी सक्षम मॉडेल तयार करणार : अहवालानुसार, "कंपनीचं उद्दिष्ट LLMs एकत्र करून आणखी सक्षम मॉडेल तयार करणं आहे ज्याला शेवटी कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता किंवा AGI म्हटलं जाऊ शकतं,". मुख्य तांत्रिक अधिकारी मीरा मुराती यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात ChatGPTला सोडचिठ्ठी दिली होती. 2015 मध्ये OpenAI ची सहस्थापना करणाऱ्या 13 व्यक्तींपैकी फक्त तीन जण अजूनही कंपनीत कार्यरत आहेत. मुराती आर्टिफिशियल इंटेलिजन्स फर्मला निधी देण्यासाठी उद्यम भांडवलदार शोधत आहे.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.