हैदराबाद OLA Maps launched : अलीकडेच राइड-हेलिंग प्रमुख ओला कॅब्सनं स्वतःचा ओला मॅप लॉन्च केला आहे. ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला कॅब्स या कंपनीनं गुगल मॅप न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल मॅप्स ऐवजी कंपनी स्वतःचं लाँच केलेले ओला मॅप्स वापरणार आहे. याचा अर्थ, कंपनीनं गुगल मॅप वरुन त्यांचं काम पूर्णपणे त्यांच्या इन-हाउस ओला मॅपवर हलवलं आहे, ज्यामुळं ते दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची बचत करणार आहेत.
After Azure exit last month, we’ve now fully exited google maps. We used to spend ₹100 cr a year but we’ve made that 0 this month by moving completely to our in house Ola maps! Check your Ola app and update if needed 😉
— Bhavish Aggarwal (@bhash) July 5, 2024
Also, Ola maps API available on @Krutrim cloud! Many more… pic.twitter.com/wYj1Q1YohO
काय म्हणाले अध्यक्ष : या संदर्भात ओला समूहाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल म्हणाले की, "गेल्या महिन्यात Azure मधून बाहेर पडल्यानंतर आम्ही आता Google Maps मधून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. आम्ही वर्षाला 100 कोटी रुपये खर्च करायचो, पण आमच्या इन-हाऊस ओला मॅप्सवर पूर्णपणे स्विच करुन आम्ही या महिन्यात ते शून्य केलं आहे."
लवकरच सविस्तर माहिती देणार : सोशल मीडियावर एक पोस्ट करत ओला ग्रुपचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी लिहिलं की, "आम्ही ओला मॅप्समध्ये काय खास बनवलं आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक खूप उत्सुक आहेत. यासोबतच, आम्ही मुक्त स्रोत समुदायाकडून काय घेतलं आहे याची माहिती देण्यासाठी लवकरच एक विस्तृत ब्लॉग प्रकाशित केला जाईल." हा ब्लॉग आठवड्याच्या शेवटी येईल असं भाविशनं सांगितलं आहे. लोकांना तो ब्लॉग वाचायला आवडेल अशी आशा कंपनीच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
- Ola Uber Bike Ban : ओला-उबरच्या बाईकवर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेशाला दिली स्थिगिती
- Ola Uber Rapido Bikes banned: परिवहन विभागाचा मोठा निर्णय.. ओला, उबेर, रॅपीडोच्या बाईक सेवेवर बंदी..
- OLA UBER Charge Extra Fee For AC : ओला-उबेर चालकांकडून मुंबईकरांची लूट?...एसीसाठी मागितले अतिरिक्त शुल्क