हैदराबाद Nissan Magnite Facelift Launch : नवीन निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. यात VDC ESC TPMS EBS सह ABS ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम सारखी वैशिष्ट्ये आहेत. ऑटो डिम फ्रेमलेस IVRM कूल्ड ग्लोव्ह बॉक्स फ्रंट आर्मरेस्ट 336-540 लीटर बूट स्पेस देखील तुम्हाला मिळणा आहे.
निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट फिचर : नवीन मॅग्नाइट फेसलिफ्टच्या डिझाइनमध्ये बदल दिसून आला आहे. त्याच्या अपग्रेडचा भाग म्हणून नवीन क्रोम इन्सर्ट देण्यात आला आहे. यात नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, मागील बाजूस असलेल्या टेल लॅम्पमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत, परंतु कारला नवीन रूप देण्यासाठी तिचे घटक बदलण्यात आले आहेत.
360-डिग्री कॅमेरा : वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, स्वयंचलित हवामान नियंत्रण, 4-रंग ॲम्बियंट लाइटिंग आणि वायरलेस फोन चार्जर समाविष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ऑटो-डिमिंग IRVM, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
काळ्या नारिंगी थीम : इंटेरिअरच्या मांडणीत फारसा बदल झालेला नाही, पण निसाननं अधिक आकर्षक बनवण्यासाठी काळ्या आणि नारंगी रंगाची थीम आणली आहे. डॅशबोर्ड जुन्या डिझाइन सारखाच दिसतोय. परंतु आता त्याला सॉफ्ट-टच लेदरेट पॅडिंग मिळतंय. सीट्समध्ये ड्युअल टोन ब्लॅक आणि ऑरेंज लेदरेट अपहोल्स्ट्री वापरण्यात आली आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स : नवीन मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच इंजिन पर्याय आहेत. यात जुन्या आवृत्तीचं समान 1-लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. एस्पिरेटेड इंजिन 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क निर्माण करतं, तर टर्बो-पेट्रोल इंजिन 100 PS पॉवर आणि 160 Nm टॉर्क जनरेट करतं. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड AMT आणि CVT ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.
हे वाचलंत का :