कॅलिफोर्निया : एलॉन मस्कच्या न्यूरालिंकने त्याचा मेंदू-संगणक इंटरफेस मानवांमध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला आहे. ही प्रक्रिया कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्लिनिकल चाचणीचा उद्देश अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या विचारांद्वारे उपकरणे नियंत्रित करण्यास सक्षम करणे आहे. या चाचणीची विशेष बाब म्हणजे हे अशा प्रकारचे पहिले मानवी प्रत्यारोपण आहे.
'या' रूग्णांवर लक्ष केंद्रित करते : न्यूरालिंकनं मानवी रुग्णामध्ये मेंदू-संगणक इंटरफेसचे यशस्वीरित्या रोपण करून एक मोठी प्रगती केली आहे. क्लिनिकल ट्रायल 22 आणि त्याहून अधिक वयाच्या क्वाड्रिप्लेजिया आणि अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) असलेल्या रूग्णांवर लक्ष केंद्रित करते. हे यश गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण असू शकते.
वायरलेस ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस : न्यूरालिंकच्या तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट व्यक्तींना त्यांचे विचार वापरून उपकरणे नियंत्रित करण्यासाठी सक्षम करणे आहे. यामुळे पक्षाघातानं जगणाऱ्या लोकांच्या जीवनात संभाव्य क्रांती घडून येईल. एलॉन मस्कने याबाबतची एक्स मीडियावर घोषणा केली. मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक परिणामांमध्ये आशादायक न्यूरल स्पाइक डिटेक्शन दिसून येतं.
मानवी चाचण्या सुरू करण्यास मान्यता : गेल्या वर्षी FDA ने कंपनीला त्याच्या न्यूरल-चिप तंत्रज्ञानासाठी मानवी चाचण्या सुरू करण्यास मान्यता दिली. सप्टेंबर 2023 मध्ये, Neuralink नं घोषणा इम्प्लांटच्या पहिल्या मानवी क्लिनिकल चाचण्यांची घोषणा केली होती. 22 वर्षांपेक्षा जास्त वयाचे क्वाड्रिप्लेजिया आणि अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) असलेले रुग्ण चालू चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. चाचणी स्वतंत्र संस्थात्मक पुनरावलोकन बोर्डाद्वारे देखरेख केली जात आहे. वायरलेस ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणं हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा :