ETV Bharat / technology

सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावरून साधणार संवाद - Sunita Williams - SUNITA WILLIAMS

NASA astronaut Sunita Williams : 13 सप्टेंबर रोजी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून पृथ्वीर कॉलद्वारे न्यूज कॉन्फरन्समध्ये सहभागी होतील. स्टारलाइनर परतल्यानंतर अंतराळवीर पहिल्यांदाच त्यांचं अनुभव शेअर करतील.

NASA astronaut Sunita Williams
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर (ANI)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 13, 2024, 1:26 PM IST

वॉशिंग्टन डीसी NASA astronaut Sunita Williams : नासाच्या अंतराळवीर सुनीता सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच आज पृथ्वीवर फोन करून संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून त्या पत्रकार परिषदेत सहभागी होतील, यूएस स्पेस एजन्सीनं म्हणटलंय. स्पेस कॉल 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता शेड्यूल केला आहे. ह्यूस्टनमधील NASA च्या जॉन्सन स्पेस सेंटरमधून या जोडीनं 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात प्रथम क्रू फ्लाइटसाठी झेप घेतली होती. ते 6 जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचलं होतं.

इथं पहा लाइव्ह : माहिती देताना NASA नं सांगितलं, की या कार्यक्रमाचं कव्हरेज NASA+, NASA ॲप आणि एजन्सीच्या वेबसाइटवर प्रसारित केलं जाईल. सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर NASA याचं कव्हरेज करणार आहे.

स्टारलाइनर परतल्यानंतर प्रथमच संवाद : स्टारलाइनरच्या पुनरागमनानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अनुभव सांगण्याची ही पहिलीच वेळ असेल. दोन्ही अंतराळवीर मिशनची नियोजित वेळ वाढवण्याशी संबंधित आव्हानं आणि संधींबद्दल बोलतील, अशी अपेक्षा आहे. 13 सप्टेंबर रोजी, दोन्ही अंतराळवीर पृथ्वी टू स्पेस कॉलद्वारे न्यूज कॉन्फरन्समध्ये सामील होतील. तसंच त्यांचे अनुभव शेअर करतील. यासोबतच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आयएसएस, ऑर्बिट लॅबोरेटरी आणि तिथल्या जीवनाबाबत सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी त्यांचे अनुभव सांगतील.

स्टारलाइनर पृथ्वीवर परतलं : त्यानंतर त्यात खराबी आली होती. स्टारलाइनरला क्रूशिवाय मागच्या आठवड्यात 6 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पृथ्वीवर परतलंय. हे दोघेही अंतराळवीर तीन महिन्यांहून अधिक काळ अंतराळात आहे. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बरवर यानं सुरक्षित लँडिंग केलं होतं. त्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही स्टारलाइनर अवकाशयान पृथ्वीवर आणल्याबद्दल त्यांच्या टीमचं कौतुक केलं होतं. दोन्ही अंतराळवीर Expedition 71/72 क्रूचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहतील. NASA च्या SpaceX Crew-9 मोहिमेतील इतर दोन क्रू सदस्यांसह SpaceX ड्रॅगन अंतराळयानावर बसून फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परततील, अशी अपेक्षा आहे.

हे वाचलंत का :

एलोन मस्कच्या SpaceX नं रचला इतिहास, प्रथमच खाजगी क्रू अवकाशात पाठवले - Polaris Dawn Mission Launch

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.