हैदराबाद Motorola Edge 50 Neo : मोटोरोलाचा 5G फोन 'Motorola Edge 50 Neo' आज दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे. फोन लाँच झाल्यानंतर फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर फोनची अनेक विशेष वैशिष्ट्ये दिली आहेत. हा फोन IP68 वाटरप्रूफ असणार आहे. हा फोन युरोपियन मार्केटमध्ये आधीच उपलब्ध झाला आहे. आता भारतीय व्हेरियंट ग्लोबल व्हेरियंट सारखाच असण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. फोनमध्ये कोणते फिचर आहेत ? फोनची किंमत किती असणार आहे?, चला सविस्तर जाणून घेऊया...
चार रंगात येईल फोन : Motorola Edge 50 Neo भारतात 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. तो फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर "1-तास फ्लॅश सेल" देखील देण्यात आला आहे. एज 50 निओ देशात पॅन्टोन-क्युरेटेड रंग तसंच लेदर फिनिशमध्ये येईल. Grisaille, Latte, Nautical Blue आणि Poinciana या चार रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
Motorola Edge 50 Neo ची वैशिष्ट्ये : Motorola Edge 50 Neo MIL-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशनसह येईल. फोन खुपच मजबूत असणार आहे. फोन अचानक खाली पडल्यास फोन तुटण्याची भीती आता नाहीय. तसंच अति तापमानाचा सामना करण्यास फोन सक्षम असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्यासाठी, फोन IP68 रेटिंगसह येईल. या फोन पाण्यातही काम करू शकतो.
AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज : हा फोन Android 14 वर आधारित Hello UI सह येईल. मोटोरोला फोनवर पाच वर्षांचं ओएस अपग्रेड तसंच पाच वर्षांची सुरक्षा अद्यतने देखील प्रदान करेल. Motorola Edge 50 Neo फ्लिपकार्ट मायक्रोसाइटनुसार, ते एआय स्टाइल सिंक आणि एआय मॅजिक कॅनव्हास सारख्या जनरेटिव्ह मोटो एआय वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.
सोनी लेन्ससह 50MP कॅमेरा : फोनमध्ये 120Hz LTPO ॲडॉप्टिव्ह डिस्प्ले असेल. ज्याची पीक ब्राइटनेस पातळी 3,000 nits असणार आहे. तसंच यात SGS नेत्र (डोळे) संरक्षण आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण असेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा Sony Lithium 700C मुख्य सेन्सर असेल. यात 3x ऑप्टिकल झूम आणि 30x डिजिटल झूम सपोर्टसह 10-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा लेन्स देखील असेल.
जलद चार्जिंग : मायक्रोसाइटनुसार, फोन MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4310mAh बॅटरी आणि 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB स्टोरेजसह येईल. हे स्मार्ट कनेक्ट आणि फॅमिली स्पेस, मोटो कनेक्ट आणि मोटो सिक्योर सारख्या वैशिष्ट्यांना देखील सपोर्ट देईल.
फोनची किंमत : Motorola Edge 50 Neo चं ग्लोबल व्हेरियंट MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 6.4-इंचाचा poOLED डिस्प्ले, Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर आणि 68W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायर्ड चार्जिंग 4310mAh बॅटरीसह येतो. निवडक युरोपियन बाजारपेठांमध्ये त्याची किंमत अंदाजे रु 46,000 आहे. भारतात याची किंमत उघड झालेली नाहीय. लॉंच झाल्यानंतर किंमतीची माहिती मिळणार आहे.
हे वाचलंत का :