ETV Bharat / technology

चंद्र गायब झाल्यास पृथ्वीचं काय होणार?, तुमच्या झोपेला चंद्र कसा करतो नियंत्रित? - MOONLESS EARTH - MOONLESS EARTH

MOONLESS EARTH : लहानपणापासून चंद्रांबद्दल आपण ऐकत आलोय. मात्र, चंद्र अचानक गायब झाल्यास पृथ्वीवर त्याचे काय परिणाम होतील तुम्हाला माहिती का? तसंच चंद्र तुमच्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे? तुमची झोप आणि चंद्राचा काय संबंध आहे? इत्यादी प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.

MOON EARTH
चंद्र, पृथ्वी (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 31, 2024, 1:47 PM IST

हैदराबाद MOONLESS EARTH : चंद्र हा 4.5 अब्ज वर्षांहून अधिक काळ पृथ्वीचा विश्वासू साथीदार आहे. पथ्वीवरील भरती ओहटी प्रक्रियेवर चंद्र प्रभाव टाकतो. तसंच पथ्वीवरील अक्ष स्थिर करण्यात चंद्राची महत्वाची भूमीका आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की चंद्र अचानक गायब झाला, तर काय होईल? त्याचे पृथ्वीवर काय परिणाम होईल? याचं प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. "चंद्रविरहित पृथ्वीचे परिणाम दूरगामी, विनाशकारी असतील," असं नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. "आपल्या ग्रहाचा समतोल राखण्यात चंद्राची महत्वाची भूमीका आहे", असं संशोधक डॉ. मारिया रॉड्रिग्ज यांनी संशोधनात म्हटलं आहे.

महासागरातील भरती विस्कळीत होणार : चंद्र तसंच सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळं महासागराच्या पाण्याच्या पातळीत नियमित वाढ वाढ होते. यालाच आपण भरती ओहोटी असं म्हणतो. चंद्र नसन्याचा सर्वाधिक परिणाम महासागरावर होईल. ज्यामुळं किनारपट्टीची धूप, पूर समस्या निर्माण होतील. तसंच सागरी परिसंस्थांमध्ये व्यत्यय निर्माण होईल.

हवामानात बदल : चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीचा अक्ष स्थिर होण्यास मदत होते. पृथ्वी कायम 23.5 अंशांवर झुकलेली असते. चंद्र नसल्यामुळं तिचा अक्ष बदलण्याची जास्त शक्यता असते. ज्यामुळं हवामानातील अत्यंत चढ-उतार होऊ शकतात. परिणामी पृथ्वीवरील काही भाग तापमान वाढेल तसंच काही भागातील तापमानात अचानक घट होईल. त्यामुळं मोठ्या प्रमाणात सजीवसृष्टीवर परिणाम होईल.

भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक : चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सला स्थिर करण्यास मदत करतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर प्रभावच नसेल तर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक वाढेल. ज्यातून व्यापक विनाश तसंच जीवितहानी होईल.

विस्कळीत झोप : चंद्र आपल्या झोपण्याच्या पद्धतींवर (circadian rhythm) देखील परिणाम करतो. शरीरात 24 तासांचं नैसर्गिक घड्याळ आहे, जे झोपेचं चक्र नियंत्रित करत. त्याशिवाय,आपली शरिरातील अंतर्गत घड्याळं विस्कळीत होतील. ज्यामुळं झोपेचे विकार, थकवा, संबंधित आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

चंद्र संसाधनं विकास : अंतराळात संशोधन करण्यासाठी चंद्र हा एक मौल्यवान स्त्रोत आहे. चंद्राची अनुपस्थिती हीलियम-3 सारख्या संसाधनांचा वापर करण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणेल. तसंच अतंराळातील संशोधन करण्यासाठी चंद्र पृथ्वीजवळील सर्वात जवळचा स्त्रोत आहे. त्यामुळं आपण त्याचा उपयोग करून इतर ग्रहांचं संशोधन करण्यावर बंधनं येतील.

चंद्र पृथ्वीचा अविभाज्य घटक : शेवटी, चंद्रविरहित पृथ्वीची कल्पना आपल्यासाठी त्रासदायकच आहे. चंद्रच्या अनुपस्थितीचे परिणाम आपल्या महासागरांवर, हवामानावर, भूगर्भशास्त्रावर तसंच अगदी आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम करणारे असतील. त्यामुळं आपणाला जशी पृथ्वीवरील प्रदुषणाची काळजी आहे, तशीच काळजी भविष्यात आपल्याला चंद्राची घ्यवी लागेल. कारण चंद्र पृथ्वीच्या नाजूक संतुलनाचा अविभाज्य घटक आहे.

'हे' वाचलंत का :

  1. मोबईलमुळं अंगावर पडते वीज?: वीज पावसाळ्यातच का पडते? काय आहे वीज पडण्यामागील सत्य?, - How lightning strikes
  2. पृथ्वीवर प्रथमच विद्युत क्षेत्राचा लागला शोध, 60 वर्षांच्या प्रयत्नांना यश - Electric Field on Earth
  3. बोइंग स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परतणार, सुनीता विल्यम्स, बुच विल्मोरबाबत मोठी बातमी - Boeing Starliner return to Earth

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.