हैदराबाद Maruti Suzuki Price Hike : आता नवीन वर्षात मारुती सुझुकीची कार घेणं महाग होणार आहे. मारुती सुझुकीनं कारच्या किमतीत 4% पर्यंत वाढ केली आहे, जी वेगवेगळ्या मॉडेल्सवर लागू असेल. ही वाढ कारच्या एक्स-शोरूम किमतीवर लागू होईल. मात्र, कोणत्या गाड्यांवर किती वाढ होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. नवीन किमती 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. कंपनीनं वाढतं लॉजिस्टिक कॉस्ट हे किमती वाढवण्यामागं कारण सांगितलं आहे.
कार खरेदी करणं होणार महाग : डिसेंबरमध्ये कार खरेदी करणं फायदेशीर आहे. पुढील महिन्यापासून कार खरेदी करणं महाग होणार आहे, अशा परिस्थितीत या महिन्यात कार खरेदी करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण कंपनी अल्टो ते ग्रँड विटारावर चांगली सूट देत आहे. अलीकडेच, मारुती सुझुकीनं आपली लोकप्रिय सेडान कार डिझायर फेसलिफ्ट मॉडेल लाँच केली. या कारची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे.
ह्युंदाईनंही वाढवली किंमत : मारुती सुझुकीच्या आधी ह्युंदाईनंही कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या कार 25,000 रुपयांनी महाग होतील. इनपुट कॉस्ट, एक्सचेंज रेट इफेक्ट आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळं कंपनीला किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
नवीन किमती 1 जानेवारीपासून लागू : या प्रसंगी कंपनीचं उपाध्यक्ष आणि सीओओ तरुण गर्ग म्हणाले, "वाढत्या किमती ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. परंतु, खर्चात वाढ झाल्यानं किमतीत किरकोळ वाढ करणं आमच्यासाठी आवश्यक झालं आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. Hyundai च्या पोर्टफोलिओबद्दल सांगायचं तर, सध्या कंपनीकडं Grand i10 Nios ते IONIQ सारख्या प्रीमियम कार आहेत. 5 EV, ज्याची किंमत 5.92 लाख ते 46.05 लाख रुपये आहे. Hyundai नं यावर्षी जानेवारी 2023 आणि एप्रिल 2024 मध्ये किमती वाढवल्या होत्या. जानेवारी 2023 मध्ये, इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळं सर्व मॉडेल्सच्या किमती सरासरी 1.5%-2% ने वाढल्या. एप्रिल 2024 मध्ये, BS6 फेज-II निकषांमुळं मॉडेल्समध्ये केलेल्या अपडेटमुळं किमती वाढल्या होत्या.
हे वाचलंत का :