हैदराबाद Discounts on Maruti Suzuki cars : मारुती सुझुकीच्या एरिना डीलर्सनी सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी कर खरेदीवर मोठी सूट जाहीर केलीय. Swift, Brezza, Alto K10, S-Preso, Wagon-R, Celerio आणि Dzire यासह मारुतीच्या सर्वाधिक पसंतीच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. MPV कार Ertiga कारवर या महिन्यात कोणतीही सूट मिळणार नाहीय. पण, मारुतीच्या कारवरील सूट प्रत्येक शहरानुसार बदलू शकते. ही सूट कार स्टॉकच्या उपलब्धतेवर देखील अवलंबून आहे. योग्य सूट मिळवण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता.
मारुती सुझुकी वॅगन आर : मारुती सुझुकीची वॅगन-आर दोन भिन्न इंजिन पर्यायांसह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. 1.0 लिटर आणि 1.2 लिटर दोन्ही इंजिन स्वयंचलित गिअरबॉक्ससह येतात. दोन्ही इंजिन मॉडेल्सवर डीलर्स 53,100 रुपयांची सूट देत आहेत. Wagon-R च्या CNG मॅन्युअल व्हेरियंटवर 48,100 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट : डीलर्स नवीन पिढीला ऑफर करत आहेत डीलर्स स्विफ्ट 28,100 रुपयांची सूट देत आहेत. स्विफ्टच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर ही सूट उपलब्ध आहे तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 33,100 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. जुन्या पिढीच्या न विकल्या गेलेल्या स्विफ्ट युनिट्सवर, डीलर्स पेट्रोल व्हेरियंटसाठी 28,100 रुपये आणि CNG व्हेरियंटसाठी 18,100 रुपयांची सूट देत आहेत.
मारुती सुझुकी डिझायर : मारुती सुझुकीचे एरिना डीलर्स डिझायरच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. मॅन्युअल वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर 25,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या महिन्यात डिझायरच्या CNG प्रकारावर कोणतीही सूट दिली जात नाही. मारुती सणासुदीच्या काळात पुढच्या पिढीची डिझायर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा : मारुतीच्या ब्रेझावर 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ही ऑफर सर्व प्रकारांवर उपलब्ध आहे. या महिन्यात इतर कारच्या तुलनेत Brezza वर कमीत कमी सूट मिळत आहे. Brezza च्या CNG प्रकारावर इतर कोणतीही सूट दिली जात नाही.
मारुती सुझुकी अल्टो K10 : Alto K10 च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर डीलर्स 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. मॅन्युअल वेरिएंटबद्दल बोलायचं झालं तर, त्यावर 45,100 रुपयांची सूट आहे. Alto K10 च्या CNG प्रकारावर 43,100 रुपयांची सूट दिली जात आहे. Alto K10 हे 1.0-लिटर, तीन-सिलेंडर, एस्पिरेटेड 67-hp पेट्रोल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स प्रकारात उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो : डीलर्स मारुतीच्या छोट्या कार S-Presso वरही मोठी सूट देत आहेत. S-Presso मध्ये Alto K10 प्रमाणेच 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड MT आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह जोडलेलं आहे. ऑटोमॅटिक वेरिएंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यावर 53,100 रुपये आणि पेट्रोल-मॅन्युअल आणि CNG व्हेरिएंटवर 48,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो : मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन असलेली दुसरी हॅचबॅक कार आहे. सेलेरियो असं या कारचं नाव आहे. या कारची सध्याची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख ते 7.04 लाख रुपये आहे. या महिन्यात देखील, S-Preso प्रमाणे, जर आपण ऑटोमॅटिक वेरिएंटबद्दल बोललो तर, त्यावर 53,100 रुपये आणि पेट्रोल-मॅन्युअल आणि CNG दोन्ही प्रकारांवर 48,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी Eeco : सप्टेंबरमध्ये मारुतीच्या Eeco कारच्या सर्व प्रकारांवर सूट मिळत आहे. डीलर्स Eeco वर 28,100 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. Eeco ची एक्स-शोरूम किंमत सध्या 5.32 लाख ते 6.58 लाख रुपये आहे.
हे वाचलंत का :
- Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched
- इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत 3 लाखांची कपात, मोफत चार्जिंग सुविधा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Tata Motors Festival EV Cars Offers
- Tata Motors च्या फेस्टिव्हल ऑफर्सचा धमाका : सणासुदीच्या हंगामात SUV वर बंपर सुट - Tata Motors Festival Cars Offers