हैदराबाद Mahindra Veero LCV Launched : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानं व्यावसायिक एक नवीन वाहन लाँच केलं आहे. कंपनीनं महिंद्र वीरो लाँच केलंय. त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आहेत? काय वैशिष्ट्ये आहे? या बातमीतून जाणून घेऊया..
महिंद्रा वीरो लाँच : महिंद्रा कंपनीनं भारतीय बाजारपेठेत महिंद्राची वीरो लॉन्च केली आहे. हे हलके व्यावसायिक वाहन असून शक्तिशाली इंजिनसह विविध फिचर त्यात दिले आहेत.
वैशिष्ट्ये कशी आहेत? : महिंद्राची वीरो कंपनीनं तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये ड्रायव्हर सीट स्लाइड आणि रिक्लाइन तसंच फ्लॅट फोल्ड सीट्स, डोअर आर्म-रेस्ट, मोबाइल डॉक, पियानो ब्लॅक क्लस्टर बेझल, ड्रायव्हर एअरबॅग, हीटर आणि एसी, फास्ट चार्जिंग यूएसबी सी-टाइप, 26.03 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, यांचा समावेश आहे. स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, पॉवर्ड विंडो यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
किती शक्तिशाली इंजिन : कंपनीनं महिंद्रा वीरो डिझेल आणि सीएनजीच्या पर्यायासह बाजारात आणलं आहे. ज्यामध्ये 1.5-लिटर mDI डिझेल इंजिन दिलेलं आहे, जे 59.7 kW चा पॉवर आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. CNG सह उपलब्ध असलेले इंजिन 67.2 kW ची शक्ती आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं.
महिंद्रा वीरोची क्षमता : महिंद्राचे हे वाहन सीबीसी, स्टँडर्ड डेक आणि हाय डेक कार्गोसाठी डिझाइन केलेलं आहे. ज्याचा XL 2765 mm आहे, XXL 3035 mm आहे. त्याची डिझेलवर लोड घेण्याची क्षमता 1.6 टन आणि 1.55 टन आहे. तसंच CNG इंजनची क्षमता 1.5 टन आणि 1.4 टन आहे.
किती आहे किंमत : महिंद्रानं त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये ठेवली आहे. त्याचा V2 CBC XL प्रकार या किमतीत खरेदी करता येईल. तसंच V6 SD XL प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 9.56 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हे वाचलंत का :