हैदराबाद Lava Blaze 3 5G : लावा आपल्या भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन फोन सादर करणार आहे. या आगामी फोनचं नाव Lava Blaze3 5G आहे. या फोनचं लँडिंग पेज Amazon वर लाइव्ह झालं आहे. Lava चा नवीन पहिला Vibe Lite फोन म्हणून सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. हा फोन प्रीमियम ग्लास बॅक डिझाइनसह आणला जात आहे. कंपनीनं लॉन्च होण्यापूर्वीच फोनचे प्रमुख स्पेक्स तसंच फोनच्या विशेष किंमतीचे तपशील जारी केले आहेत.
प्रोसेसर, रॅम-स्टोरेज : Lava चा नवा फोन MediaTek D6300 प्रोसेसरसह आणला जात आहे. हा फोन 6GB + 6GB रॅम आणि 128GB UFS स्टोरेजसह आणला जात आहे.
दोन रंगात उपलब्ध : लावा फोन 6.56 इंच एचडी + पंच होल डिस्प्लेसह आणला जाईल. फोन 90hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ग्लास ब्लू आणि ग्लास गोल्ड.
50MP + 2MP AI रियर कॅमेरा : Lava Blaze 3 5G आगामी फोन 50MP + 2MP AI रियर कॅमेरासह आणला जाईल. सेल्फीसाठी हा फोन 8MP सेल्फी कॅमेरासह आणला जात आहे. Vibe Light बद्दल सांगायचं तर, जेव्हा वापरकर्ता कमी प्रकाशात व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो तेव्हा Vibe Light च्या मदतीनं लाइटिंग एडजस्टमेंट करता येते. याशिवाय तुम्हाला फोटोग्राफीचा चांगला अनुभव मिळेल.
बॅटरी : बॅटरीबद्दल बोलायचं झाले तर, फोन 5000MmAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्टसह आणला जाईल.
5G बँड सपोर्ट : लावा फोन सर्व 5G बँडसाठी समर्थनासह भारतात लॉंच करण्यात येणार आहे. फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकरची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन 9999 रुपयांच्या स्पेशल लॉन्च किंमतीसह आणला जात आहे. फोनच्या लॉन्च तारखेची माहिती लवकरच दिली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
हे वाचलंत का :