हैदराबाद : देशातील निवडक किआ डीलरशिपवर नवीन Kia Syrosची अनधिकृत बुकिंग सुरू झाल्याची अधिकृत कोणतीही माहिती कियानं दिलेली नाहीय. मात्र, कंपनीनं कारची बुकींग सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहे. किया कंपनी 19 डिसेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर किआ सायरोस लॉंच करण्यास सज्ज आहे. सोनेट आणि सेल्टोस दरम्यान येणारी ही एसयूव्ही आता 21,000 रुपयांमध्ये अनधिकृतपणे बुक करता येईल. चाला कारची माहिती घेऊया या बातमीतून...
Kia Syrosमध्ये दोन इंजिन पर्याय : किआ सायरोस दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. पहिलं 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल असेल इंजिन असणार आहे, तर दुसरं 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल. त्यात मानक म्हणून 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. पर्यायी 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डीसीटी युनिट्स असतील.
Kia Syrosमध्ये ADAS उपलब्ध होण्याची शक्यता : एका अहवालानुसार, किआच्या आगामी एसयूव्हीमध्ये 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, एक ADAS सूट, रिक्लाइन आणि व्हेंटिलेशन फंक्शन्ससह मागील सीट्स निवडण्यासाठी 6 प्रकारांची श्रेणी असू शकते.
Kia Syrosची संभाव्य वैशिष्ट्ये : 2025 किआ सायरोसच्या मागील टीझरमध्ये अनेक खुलासे करण्यात आले होते. नवीन टीझर पाहता, त्यात लांब स्टॅक केलेले एलईडी हेडलाइट्स, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, एल-आकाराचे टू-पीस एलईडी टेललाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 360-डिग्री कॅमेरा, मागील एसी व्हेंट्स, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एक नवीन स्टीअरिंग व्हील मिळू शकते.
कसं असेल डिझाइन : टीझरमध्ये एसयूव्हीची थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. यानुसार, एसयूव्हीचा फ्रंट नुकताच लॉंच झालेल्या किया कार्निव्हल आणि ईव्ही9 सारखा ठेवण्यात आला आहे. तसंच कार्निव्हलप्रमाणे हेडलाइट्स ठेवण्यात आलं आहेत. नवीन एसयूव्हीमध्ये एलईडी लाईट्ससोबत एलईडी डीआरएल देखील उपलब्ध असतील. किआचा लोगो बोनेटच्या मध्यभागी ठेवला आहे.
कधी होणार लॉंच? : कंपनीनं अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, नवीन SUV 19 डिसेंबर 2024 दरम्यान भारतीय बाजारपेठेत लॉंच होण्याची शक्यता आहे.
किती असेल किंमत? : कंपनीकडून लॉंचवेळीच एसयूव्हीची किंमत समोर येइल. परंतु अशी अपेक्षा आहे की Syros SUV Kia 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉंच होऊ शकते.
हे वाचलंत का :