हैदराबाद : iQOO 13 विशेष ग्राहकांना उत्तम ऑफर मिळत आहे. iQOO 13 मध्ये क्वालकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसरशिवाय, यात सोनीचा फ्लॅगशिप कॅमेरा सेटअप आणि उत्कृष्ट बिल्ड गुणवत्ता आहे. या फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू होत असून, बुकिंग करणाऱ्यांना विशेष ऑफरचा लाभ दिला जात आहे.
”iQOO 13 is a performance powerhouse that outperforms others in its segment” - @91mobiles 🏆 The #iQOO13 is setting benchmarks with the India's Fastest Smartphone. Ever*., the Snapdragon 8 Elite, delivering unparalleled performance, innovative design, and cutting-edge features.… pic.twitter.com/R2q9uWRQLb
— iQOO India (@IqooInd) December 5, 2024
12 महिन्यांची अधिक वॉरंटी : iQOO 13 स्मार्टफोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता. त्याची मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह झाली आहे, ज्यावर फोनच्या वैशिष्ट्यांसह प्री-बुकिंग ऑफरची माहिती दिली आहे. हा फोन बुक करणाऱ्या ग्राहकांना 12 महिन्यांची अधिक वॉरंटी आणि फ्री इयरबड सारखे फायदे दिले जात आहेत.
प्री-बुकिंगवर मिळताय फोयदे : भारतीय बाजारात, iQOO 13 च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु सवलतीनंतर, हा फोन 51 हजार 999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 59 हजार 999 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये हा फोन तुम्ही 56 हजार 999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन अल्फा, नार्डो ग्रे, व्हाईट आणि ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस : आयसीआयसीआय बँक किंवा एचडीएफसी बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास ग्राहकांना 3000 रुपयांचीही झटपट सूट मिळेल. तसंच, 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Vivo किंवा iQOO फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या फोनच्या प्री-बुकिंगवर, 12 महिन्यांच्या विस्तारित वॉरंटीशिवाय, 2 हजा 99 रुपये किमतीचे iQOO TWS 1e इयरबड्स मोफत दिले जात आहेत. हा फोन ९९९ रुपये भरून प्री-बुकिंग करता येईल.
iQOO 13 5G ची वैशिष्ट्ये : iQOO स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असून 4500nits च्या पीक ब्राइटनेस डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आणि Android 15 वर आधारित सॉफ्टवेअर आहे. फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP मुख्य, 50MP टेलिफोटो आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्ससह तिहेरी कॅमेरा सेटअप आहे. तसंच यात 32MP सेल्फी कॅमेरा असून 6000mAh बॅटरी आहे. हा फोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.
हे वाचलंत का :