हैदराबाद Infinix XPad LTE launched in India : Infinix नं भारतात आपला पहिला टॅबलेट XPad लॉन्च केला आहे. Infinix XPad LTE हा कंपनीचा एंट्री-लेव्हल टॅब आहे, जो मेटल युनिबॉडी डिझाइनसह येतो. Infinix Xpad LTE मध्ये 11 इंच फुलएचडी+ डिस्प्ले, 7000mAh बॅटरी आणि 128GB स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये आहेत. नवीनतम Infinix टॅब्लेटची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या…
Infinix XPad LTE किंमत : Infinix XPad LTE च्या 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. या टॅब्लेटची विक्री 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. हा टॅबलेट टायटन गोल्ड, स्टेलर ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल. बँक ऑफर्ससह हा हँडसेट 9 हजार 899 रुपयांना मिळण्याची संधी आहे.
Infinix XPad LTE वैशिष्ट्ये : Infinix XPad चे Wi-Fi आणि LTE प्रकार मेटल युनिबॉडी डिझाइनसह सादर केले आहेत. या डिव्हाइसमध्ये 11 इंच फुलएचडी + 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. स्क्रीन (1200 x 1920 पिक्सेल) रिझोल्यूशन ऑफर करते. डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 83 टक्के आणि पीक ब्राइटनेस 440 निट्स आहे.
7000mAh बॅटरी : MediaTek Helio G99 प्रोसेसर Infinix XPad LTE मध्ये उपलब्ध आहे. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 7000mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे जी 18W USB Type-C चार्जिंगला सपोर्ट करते. या टॅबलेटमध्ये 4 GB रॅम आणि 8 GB रॅमसह 128 आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
DTS ऑडिओ प्रोसेसिंग : इन्फिनिक्सचा हा स्वस्त टॅबलेट DTS ऑडिओ प्रोसेसिंग, 4 स्पीकर आणि 4 साउंड मोडसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये ChatGPT पॉवर्ड फोलॅक्स व्हॉईस असिस्टंट उपलब्ध आहे. Xpad मध्ये G-Sensor, E-compass, Gyroscope दिलेले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 2G, 3G, 4G, Wi-Fi 5, Bluetooth 5.0 आणि 3.5 mm ऑडिओ जॅक आहे. डिव्हाइस Android 14 आधारित XOS सह येतो. या किफायतशीर टॅबलेटची परिमाणे 257.04 x 168.62 x 7.58 मिमी आणि वजन 496 ग्रॅम आहे.
हे वाचलंत का :