हैदराबाद Infinix Hot 50 5G : Infinix Hot 50 5G स्मार्टफोन भारतात 5 सप्टेंबर रोजी लॉन्च होत आहे. अलीकडेच कंपनीनं फोनचं डिझाइन आणि प्रमुख फिचर उघड केले आहेत. आता Infinix नं या फोनच्या किमतीची माहिती दिली आहे. Infinix Hot 50 4G, Hot 50 Pro, Hot 50 Pro+ आणि Hot 50i सारख्या मॉडेल्ससह लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीनं उर्वरित मॉडेल्सची माहिती शेअर केलेली नाही.
सीरिजमधील सर्वात स्लीम फोन : Infinix Hot 50 5G हा सीरिजमधील सर्वात स्लीम 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातं. हा फोन ‘फ्लिपकार्टवर 10 हजार रुपयापेक्षा किमतीला मिळू शकतो. यावरून असे दिसून येते की Infinix Hot 50 5G स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. Infinix Hot 50 5G च्या किंमत श्रेणीबद्दल माहिती फ्लिपकार्ट मायक्रोसाइटवर देण्यात आली आहे. साइटवरील एका छोटा व्हिडिओत हा फोन केवळ फ्लिपकार्टवर भारतात खरेदीसाठी उपलब्ध राहणार असल्याचा दावा केलाय.
Infinix Hot 50 5G वैशिष्ट्ये : कंपनीनं आधीच खुलासा केला आहे की, Hot 50 5G ची जाडी 7.8mm असेल. फोन कमीत कमी तीन रंग पर्यायांमध्ये ऑफर केला जाईल. निळा, हिरवा आणि हलका ग्रे. हँडसेटमध्ये उभ्या पिल-आकाराचं मागील कॅमेरा मॉड्यूल असेल. हा फोन धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण करण्यास सक्षम असेल. मीडियाटेकचा डायमेंशन 6300 प्रोसेसर Infinix Hot 50 5G मध्ये दिला जाईल. यात 8GB रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज असेल. डिस्प्लेमध्ये 'वेट टच' फीचरही उपलब्ध असेल. याचा अर्थ बोटे ओली असली तरीही फोन टच स्क्रिनचा वापर करता येईल.
हे वाचलंत का :